US Tariff : अमेरिकेच्या टॅरिफ धोरणात भारताला आणखी सवलत मिळणार ?

वॉशिंग्टन : अमेरिकेने भारतातून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर २६ टक्के टॅरिफ अर्थात कर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे करताना अमेरिकेतील कारखान्यात तयार होणाऱ्या पक्क्या मालासाठी आवश्यक कच्चा माल म्हणून येणाऱ्या अनेक भारतीय वस्तू तसेच अमेरिकेसाठी महत्त्वाच्या असलेल्या भारतीय वस्तू यांना टॅरिफमधून सवलत देण्यात आली आहे. आता अमेरिका भारताला द्यायच्या सवलतीत आणखी वाढ करण्याचा विचार करत आहे. या मुद्यावर भारत आणि अमेरिकेच्या प्रतिनिधी मंडळांची चर्चा सुरू आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार भारत, इस्रायल आणि व्हिएतनाम या तीन देशांच्या प्रतिनिधी मंडळांशी अमेरिका चर्चा करत आहे.



भारत - अमेरिका यांच्यातील आयात - निर्यात व्यापारात दोन्ही देशांच्या लाभांचा विचार करुन तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. द्विपक्षीय व्यापार कराराची बोलणी यशस्वी झाल्यास भारताला टॅरिफमधून मिळत असलेल्या सवलतीत आणखी वाढ होणार आहे. अमेरिकेने सध्या चीन आणि कॅनडा या देशांसोबत द्विपक्षीय व्यापार कराराबाबत नव्याने चर्चेचा विचार करत नसल्याचे जाहीर केले.





अमेरिकेने जाहीर केलेल्या निर्णयानुसार ते ९ एप्रिल पासून भारतातून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर २६ टक्के टॅरिफ अर्थात कर लागू करार आहेत. व्हिएतनामच्या वस्तूंवर ४६ टक्के आणि इस्रायलच्या वस्तूंवर १६ टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे.
Comments
Add Comment

Major blow in the Iran conflict : अमेरिकेने गमावला ड्रोन ताफ्याचा चतुर्थांश भाग, ४५ 'एमक्यू-९ रीपर' नष्ट

इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षामुळे अमेरिके

Apache Helicopter Accident : अमेरिकेच्या अत्याधुनिक AH-64 अपाचे हेलिकॉप्टरचा भीषण अपघातात दोन पायलट्सचा मृत्यू

टेक्सास : अमेरिकेतील टेक्सास राज्यात अमेरिकन सैन्याच्या अत्याधुनिक AH-64 अपाचे अटॅक हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला.

Nepal Agniveer Recruitment Rally : ‘आम्हालाही भारतीय सैन्यात भरती करा!’ अग्निवीर योजनेसाठी नेपाळचे हजारो तरुण रस्त्यावर

काठमांडू : भारतात अग्निवीर योजनेअंतर्गत तरुणांची भरती सुरू असताना नेपाळमध्ये मात्र याच योजनेत सहभागी

Pakistan GHQ : रावळपिंडीत पाकिस्तानच्या लष्करी मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ गोळीबार; गोळीबार करणारा बंदूकधारी ठार

रावळपिंडी : पाकिस्तानमध्ये रावळपिंडीतील लष्करी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर हल्ला झाला. हल्ला करणाऱ्यावर

Bashar al-Assad : सीरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष असदना कोर्टाने ठोठावली फाशीची शिक्षा

सीरिया : माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद आणि त्यांचा धाकटा भाऊ महेर असद या दोघांना सीरियातील एका न्यायालयाने

Iran Cyber Attack : अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांना इराणचे हॅकिंगने उत्तर ? अमेरिकेच्या नागरिकांना हाल हाल करून मारण्याचा इराणचा डाव ?

वॉशिंग्टन डीसी : अमेरिका आणि इस्रायल यांनी इराण