Bashar al-Assad : सीरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष असदना कोर्टाने ठोठावली फाशीची शिक्षा

सीरिया : माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद आणि त्यांचा धाकटा भाऊ महेर असद या दोघांना सीरियातील एका न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. सीरियात १४ वर्षे चाललेल्या संघर्षादरम्यान पाच लाखांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला. या मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी आणि युद्ध गुन्ह्यांसाठी असद बंधूंना सीरियातील न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. शिक्षा ठोठावण्यात आली त्यावेळी असद बंधू न्यायालयात नव्हते. सध्या असद बंधू रशियात राजकीय आश्रीत म्हणून वास्तव्यास आहेत. बशर अल-असद यांचे आणखी एक भाऊ (Bashar al-Assad's cousin) अतेफ नजीब यांनाही न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. नजीब हे सीरियन सैन्याचे माजी ब्रिगेडियर जनरल आहेत, ज्यांनी २०११ मध्ये असदच्या राजवटीत दक्षिण सीरियातील दारा प्रांतातील राजकीय सुरक्षा शाखेचे प्रमुखपद भूषवले होते. शिक्षा ठोठावण्यात आली त्यावेळी अतेफ नजीब न्यायालयात उपस्थित होते.



बशर अल-असदने २००० साली माजी राष्ट्राध्यक्ष हाफेझ अल-असद यांच्या पश्चात सीरियाचे नेतृ्त्व हाती घेतले. डिसेंबर २०२४ मध्ये पदच्युत होईपर्यंत बशर अल-असदने सीरियावर राज्य केले. आधी वडिलांनी आणि नंतर मुलाने अशा पद्धतीने असद कुटुंबाने ५० वर्षांपेक्षा जास्त काळ सीरियावर राज्य केले.



सीरियात २०११ मध्ये यादवी सुरू झाली. सुरक्षा यंत्रणेने असद सरकार विरोधातील आंदोल क्रूरपणे दडपले. यानंतर काही दिवसांतच संपूर्ण सीरियात असद यांच्या विरोधात सशस्त्र उठावाला सुरुवात झाली. पण २०२४ पर्यंत अनेकदा उठाव करणाऱ्यांची ताकद वाढू लागताच असद यांचे सैनिक त्यांच्यावर तुटून पडायचे आणि अनेकांना ठार करायचे. यामुळे वारंवार प्रयत्न करूनही उठाव करणाऱ्यांना असद यांना पदच्युत करता येत नव्हते. अखेर २०२४ मध्ये बंडखोर यशस्वी झाले आणि बशर अल-असद यांनी कुटुंबासह रशियात राजकीय आश्रय घेतला. सत्तातरानंतर बशर अल-असद आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात सीरियातील न्यायालयात कायदेशीर कारवाई सुरू झाली. अखेर आता सीरियातील एका न्यायालयाने बशर अल-असद आणि त्यांचा धाकटा भाऊ महेर असद तसेच बशर अल-असद यांचे आणखी एक भाऊ (Bashar al-Assad's cousin) अतेफ नजीब यांना फाशीची शिक्षा ठोठावली आहे. या शिक्षेची अंमलबजावणी नेमकी कधी आणि कशी होणार ? हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे.

Comments
Add Comment

Pakistan GHQ : रावळपिंडीत पाकिस्तानच्या लष्करी मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ गोळीबार; गोळीबार करणारा बंदूकधारी ठार

रावळपिंडी : पाकिस्तानमध्ये रावळपिंडीतील लष्करी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर हल्ला झाला. हल्ला करणाऱ्यावर

Iran Cyber Attack : अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांना इराणचे हॅकिंगने उत्तर ? अमेरिकेच्या नागरिकांना हाल हाल करून मारण्याचा इराणचा डाव ?

वॉशिंग्टन डीसी : अमेरिका आणि इस्रायल यांनी इराण

Colombia Earthquake : कोलंबियाला भूकंपाचा भीषण धक्का! ७.४ रिश्टरचा शक्तिशाली भूकंप; १३२ जणांचा मृत्यू, परिस्थिती गंभीर

बोगोटा : कोलंबियाच्या पश्चिम भागाला सोमवारी शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या

Russian cosmonaut : रशियन अंतराळवीरांकडून भारताला स्वातंत्र्यदिनाच्या विशेष शुभेच्छा

नवी दिल्ली : भारत आपला ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील रशियन

Japan warn US : अमेरिकन प्रचारात ॲनिमे व गेम्सचा वापर, जपानने अमेरिकेला सुनावले

टोकियो : जागतिक मुत्सद्देगिरीत एक अत्यंत अनोखा वाद समोर आला आहे. जगभरात लोकप्रिय असलेल्या जपानी संस्कृतीची ओळख

Iran-US tensions : जमिनीवरील हल्ल्यास प्रत्युत्तर देण्याचा इराणचा इशारा, ट्रम्प यांच्या माघारीच्या प्रयत्नांना खीळ  

इराण आणि अमेरिका यांच्यातील भू-राजकीय तणाव दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. अमेरिकेचे लष्कर इराणी भूमीवर