ठाणे : मोबाईलवर वापरलेल्या अपशब्दामुळे सुरू झालेल्या वादाने भिवंडीतील देवनगर परिसरात गंभीर वळण घेतले. दोन कुटुंबांमध्ये सुरु झालेली शाब्दिक झटापट थेट हाणामारीत रूपांतरित झाली आणि त्याचा फटका एका तिसऱ्या कुटुंबाला बसला. त्यांच्या घराचे छत तुटले आणि नुकसान भरपाईही द्यावी लागली.
देवनगरमधील एका महिलेने मोबाईल फोनवरून दुसऱ्या कुटुंबातील सदस्याला अपशब्द वापरले. यावरून दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला आणि तो इतका चिघळला की शेजारच्या घराच्या पत्र्यावर गेलेल्या एकाला मारण्यासाठी काहीजण वर चढले. त्याला साथ देण्यासाठी दुस-या परिवारातील लोकही छतावर आले. त्यांनी एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या गोंधळात तिसऱ्याच कुटुंबाच्या घराचे छप्पर तुटले. यामध्ये काहीजण खाली कोसळले आणि किरकोळ जखमी झाले.
ज्या घराचे छत तुटले त्या घरात काही कामगार राहत होते. घटनेनंतर स्थानिक पातळीवर हस्तक्षेप करून वाद मिटवण्यात आला. पोलिसात कोणतीही तक्रार दाखल न करता दोन्ही कुटुंबांनी छप्पर तुटलेल्या घरासाठी नुकसान भरपाई देऊन समझोता केला.
ही घटना भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, दोन्ही पक्षांनी आपापसात समझोता केल्यामुळे पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले.
मुंबई : अनेक विनोदी भूमिकेतून प्रेक्षकांना हसवणाऱ्या 'चला हवा येऊ द्या' या शो मधील सागर…
मुंबई : डिजिटल रिअल इस्टेट ट्रान्झॅक्शन अँड अॅडव्हाईझरी प्लॅटफॉर्म प्रॉपटायगर डॉटकॉमच्या ताज्या अहवालानुसार, जानेवारी ते…
नवी दिल्ली : लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. तसेच तामीळनाडू भाजपाचे माजी अध्यक्ष…
उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्येक मुलींना आरामदायी आणि फॅशनेबल पोशाख हवा असतो. खास करून कॉलेज आणि ऑफिसला…
ठाणे : सध्या तीव्र उन्हाळा (Summer Season) असल्याने धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे.…
नाशिक : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक हिंदू तीर्थस्थान असणारे नाशिकमधील (Nashik) त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple )…