मुंबई : हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणार्या छत्रपती शिवाजी महाराज यांची (Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi) आज ३ एप्रिल रोजी पुण्यतिथी आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी हा दिवस महाराष्ट्रातील लोकांसाठी अत्यंत श्रद्धेचा आणि अभिमानाचा दिवस आहे. शिवाजी महाराजांचे निधन ३ एप्रिल १६८० रोजी रायगड किल्ल्यावर झाले. या दिवशी त्यांना आदरांजली अर्पण करून त्यांच्या पराक्रमाची आठवण केली जाते. दरम्यान हा संपूर्ण इतिहासातील काळा दिवस असून यावेळी शेवटच्या क्षणाला छत्रपती शिवरायांनी अतिशय महत्त्वाचे विधान केले होते. जाणून घ्या शिवरायांचे ते शेवटचे विधान कोणते व काय होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. हा दिवस इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे, कारण याच दिवशी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या पराक्रमी योद्ध्याचा जन्म झाला. (Chhatrapati Shivaji Maharaj Birth)
छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे भोसले हे आहेत. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई होते. मुघल आणि आदिलशाही साम्राज्याच्या सततच्या धोक्यामुळे, शाहजी राजेंनी आपल्या पत्नी जिजाबाई यांना सुरक्षिततेसाठी शिवनेरी किल्ल्यावर ठेवले होते. शिवरायांनी लहानपणापासूनच अन्यायाविरोधात लढण्याचा संकल्प केला होता. जमाता जिजाऊंनी शिवरायांना रामायण, महाभारत, तसेच श्रीकृष्ण आणि रामचंद्रांच्या जीवनातील युद्धकौशल्य शिकवले. तर शिवरायांनी मल्हारराव होळकर, दादाजी कोंडदेव यांच्याकडून त्यांनी घोडेस्वारी, तलवारबाजी, धनुर्विद्या आणि गनिमी कावा शिकला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा भारतीय इतिहासातील एक भव्य आणि ऐतिहासिक सोहळा होता. ६ जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर हा सोहळा पार पडला आणि शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे अधिकृत छत्रपती म्हणून विराजमान करण्यात आले. (Chhatrapati Shivaji Maharaj Rajyabhishek Sohla)
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा हिंदवी स्वराज्याच्या सशक्त आणि सार्वभौम अस्तित्वासाठी अत्यंत आवश्यक होता. त्या काळात अनेक बलाढ्य राजसत्तांनी स्वराज्याला दुय्यम मानले होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी आपल्या राजसत्तेचे वैधानिक आणि राजकीय महत्त्व प्रस्थापित करण्यासाठी राज्याभिषेक सोहळा संपन्न केला. दरम्यान, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा केवळ एका राजाचा राज्यारोहण सोहळा नव्हता, तर तो हिंदवी स्वराज्याच्या अस्तित्वाची अधिकृत घोषणा होती. यामुळे मराठा साम्राज्याला एका बलशाली आणि सार्वभौम सत्तेचा दर्जा प्राप्त झाला, ज्यामुळे पुढील अनेक पिढ्यांसाठी हिंदवी स्वराज्य टिकून राहिले.
मराठा योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांचे ३ एप्रिल १६८० रोजी प्रकृती अस्वास्थ्यामुळे निधन झाले. तेव्हापासून दरवर्षी ३ एप्रिल रोजी शूर मराठा राजाची पुण्यतिथी साजरी केली जाते.
”आम्ही जातो,आमचा काळ झाला, तुम्ही सप्तसिंधू,सप्तगंगा मुक्त करा, काशीचा श्री विश्वेश्वर सोडवा, बारा ज्योतिर्लिंग या यवनांच्या हातून मुक्त करा, हिंदवी स्वराज्यात आणा, चुकुर होऊ नका…..!! ” असे शिवरायांनी म्हटल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन ३ एप्रिल १६८० रोजी रायगड किल्ल्यावर झाले. त्यांच्या महान कार्याचा व इतिहासाचा साक्षीदार असलेल्या रायगड किल्ल्यावरच त्यांची समाधी बांधण्यात आली. ही समाधी आजही संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणास्थान आहे आणि लाखो शिवभक्तांचे श्रद्धास्थान आहे. (Shivaji Maharaj Punyatithi)
मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…
रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायजर्स हैदराबादशी होत…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…
अमित शाहांनी साधला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी…
मुंबई: जम्मू काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे पर्यटकांवर हल्ला होत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा…