रोहिणी खडसेंच्या कार्यक्रमात महिलांची हाणामारी

जालना : राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत आहे. अनेक नेते प्रचारसभा आणि प्रचारफेऱ्यांच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत. या वातावरणात जालन्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी एक प्रचारसभा घेतली. या सभेत महिलांची तुंबळ हाणामारी झाली. अंबडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रचारसभेत महिलांची हाणामारी झाली.

श्रद्धा चांगले यांच्यासाठी रोहिणी खडसेंनी घेतलेल्या प्रचारसभेत हाणामारी झाली. ही हाणामारी क्षुल्लक कारणावरुन झाल्याचे समजते. कुठल्याश्या मुद्यावरुन महिलांमध्ये शा‍ब्दिक वाद झाला. थोड्याच वेळात महिलांनी एकमेकींना धक्काबुक्की करत हाणामारी सुरू केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे बघून मंचावर उपस्थित असलेल्या महिला कार्यकर्त्यांनी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन करायला सुरुवात केली. वारंवार आवाहन करुनही हाणामारी थांबत नव्हती. अखेर आयोजकांनी मध्यस्थी केली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
Comments
Add Comment

FDA Inspections : गणेशोत्सवात महाप्रसादासाठी लागणार परवाना

- भंडाऱ्यावरही असणार ‘एफडीए’ची नजर मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांततर्फे

Pratap Sarnaik : ‘रॅपिडो’शी व्यावसायिक संबंधांचे पुरावे द्या!

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर; प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देणे योग्य

Nepal floods : नेपाळमधील पूरपरिस्थितीत नांदेडचे पर्यटक अडकले; मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने जारी केले तात्काळ संपर्क क्रमांक

नांदेड : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले

CM Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा; ‘ग्रीन स्टील हब’ म्हणून उदयास येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : गडचिरोली जिल्हा निर्मितीला २६ ऑगस्ट रोजी ४४ वर्षे पूर्ण होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

CM Devendra Fadnavis : चाकण ‘एमआयडीसी’मध्ये ४९ उद्योगांसोबत सामंजस्य करार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; २ हजार ३२० कोटींची गुंतवणूक प्रस्तावित मुंबई : चाकण-भोसरीच्या

Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुणे : चाकण परिसरातील अनेक समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व