पुणे जिल्ह्यात प्रचार जोरात

पुणे : पुणे जिल्ह्यातील आळंदी, बारामती, भोर, चाकण, दौंड, फुरसुंगी-उरुळी देवाची, इंदापूर, जेजुरी, जुन्नर, लोणावळा, राजगुरूनगर, सासवड, शिरूर, तळेगाव दाभाडे, वडगाव नगरपरिषदा, तर देहू, मंचर व माळेगाव या नगरपंचायतींसाठी प्रचार जोरात आहे. कमी दिवसांत संपूर्ण प्रभाग पिंजून काढण्याचे आव्हान उमेदवारांपुढे आहे.

सासवडमध्ये आरोप-प्रत्यारोप : सासवड नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना (शिंदेसेना), शिवसेना (उबाठा) या राजकीय पक्षांतच लढत आहे. निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचल्याने आरोप-प्रत्यारोपांनाही उधाण आले आहे. दोन पॅनलचे उमेदवार व कार्यकर्ते अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याची घाई करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलविरुद्ध भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेनेच्या (शिंदे गट) आणि इतर लहान-मोठ्या पक्षांनी एकत्र येत उभारलेल्या कृष्णा-भीमा विकास आघाडी पॅनलमधील सरळ सामना सुरू आहे. दौंड नगरपरिषदेच्या निवडणुकीत नागरिक हित संरक्षण मंडळ आणि त्यांचे मित्रपक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये थेट लढत होत आहे.

चाकणकर हैराण, बारामतीत राजकीय समीकरणे बदलली: चाकण नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचाराला जोर आहे. प्रचार वाहनांवरील स्पीकरमधून होणाऱ्या कर्कश आवाजामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. राजगुरूनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी चुरशीची चौरंगी लढत होणार आहे. नगराध्यक्षपदासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि शिवसेना (उद्धवसेना) यांच्या गटांमध्ये लढत रंगणार आहे. बारामती नगरपरिषदेचे मतदान फक्त चार दिवसांवर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते दोन्ही पक्षांतील फुटीमुळे विभागले आहेत. राजकीय विरोधक असलेला भाजप राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) मित्र बनला आहे.

आळंदीत चुरस, मंचरमध्ये सभांचा धडाका: आळंदीतील नगरपरिषद निवडणूक चुरशीची होणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात थेट लढत पाहायला मिळत आहे. शिवसेना (शिंदेसेना) आणि शिवसेना (उबाठा) यांचे उमेदवारही काही प्रभागांमध्ये निर्णायक भूमिका बजावताना दिसत आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि मनसेने कोणतीही जागा लढवली नाही. मंचर नगरपंचायतीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांची सभा घेत प्रचाराचा धडाका लावला आहे.

आमदारांची प्रतिष्ठा पणाला: भोरमध्ये आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे. दोन्ही पक्षांकडून घरोघरी प्रचार सुरू आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भोर नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) यांच्यात मुख्य लढत आहे. दोन ठिकाणी शिवसेना आणि एका ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार तसेच सहा अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
Comments
Add Comment

Sangli School Van Accident : धक्कादायक! स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; पाच वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

सांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यातून आटूगडेवाडी येथे स्कूल व्हॅनचा भीषण अपघात होऊन पाच वर्षीय मुलीचा जागीच

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

· ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित · ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील

Maharashtra News : राज्यातील प्रत्येक विभागात भव्य लोककला महोत्सव; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रातील लोककला आणि लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्याच्या प्रत्येक विभागात भव्य

ST Employees Salary : एसटीच्या 86 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा; 11 ऑगस्टला खात्यात जमा होणार जुलैचे वेतन

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन 11 ऑगस्ट रोजी

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी घेतली 'ताज हॉटेल्स'च्या सीईओंची भेट

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी

Food Poisoning : आश्रमशाळेच्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा; २७ मुले, ५ मुली उपजिल्हा रुग्णालयात

नांदेड : देगलूर तालुक्यातील हणेगावच्या वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेत जेवणातून