Sara Tendulkar : सारा तेंडुलकर मालकीण झाली बरं का! खरेदी केली मुंबई फ्रँचायझी

 ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये मुंबई फ्रँचायझी केली खरेदी


मुंबई : भारतात सध्या IPL २०२५ स्पर्धांचा हंगाम सुरू आहे. स्पर्धेचा नवीन हंगाम सुरू होऊन आठवड्याहून जास्त कालावधी झाला आहे. रोज रोमांचक सामने खेळले जात आहेत. याचदरम्यान, मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकरने एक क्रिकेट संघ खरेदी केला आहे. सारा तेंडुलकरने ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीग (GEPL) मध्ये मुंबई फ्रँचायझी खरेदी केली आहे.





मीडिया रिपोर्ट्सनुसार, डिजिटल मनोरंजन आणि तंत्रज्ञानातील जागतिक आघाडीची कंपनी जेटसिंथेसिसने घोषणा केली आहे की, सारा तेंडुलकरने ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीग (GEPL) मध्ये मुंबई फ्रँचायझी खरेदी केली आहे. या लीगचा दुसरा सीझन लवकरच सुरू होणार आहे.जेटसिंथेसिसचे सीईओ राजन नवानी म्हणाले की, मुंबई संघाची फ्रँचायझी मालक म्हणून सारा तेंडुलकरचे स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. साराला खेळ आणि ई-स्पोर्ट्समध्ये खूप रस आहे. तिची प्रचंड लोकप्रियता आमच्या मोहिमेत आम्हालाही फायदा होईल.



आपला आनंद व्यक्त करताना सारा तेंडुलकर म्हणाली की, क्रिकेट हा आमच्या कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग आहे. ई-स्पोर्ट्समध्ये क्रिकेटचा आनंद घेणे रोमांचक असेल. GEPL मध्ये मुंबई फ्रँचायझीची मालकी मिळवणे हे माझ्यासाठी एक स्वप्न पूर्ण झाले आहे. खेळावरील माझे प्रेम आणि शहराबद्दलची आवड यां दोन्हीचा यात समावेश आहे. मी आमच्या संघासह एक दमदार ई-स्पोर्ट्स फ्रँचायझी तयार करण्यास उत्सुक आहे.


GEPL ही स्पर्धा 'रिअल क्रिकेट' या तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या गेमवर खेळली जाते. आतापर्यंत ३० कोटींहून अधिक लोकांनी ते डाउनलोड केले आहे. पहिल्या हंगामाच्या सुरुवातीपासूनच या लीगची तरुणांच्यात प्रचंड क्रेझ आहे. रिपोर्ट्सनुसार, GEPL चा मल्टीप्लॅटफॉर्म रिच ७० मिलियनहून अधिक आहे आणि JioCinemas आणि Sports१८ वर २.४ दशलक्षाहून अधिक मिनिटे स्ट्रीम केली गेली आहेत, ज्यामुळे GEPL ने क्रिकेट ई-स्पोर्ट्समध्ये आपली ओळख निर्माण केली आहे.

Comments
Add Comment

Azad Maidan Protest : आझाद मैदान वगळता मुंबईत सर्व ठिकाणी आंदोलनास बंदी

- गृह विभागाचे तातडीचे आदेश; मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची खबरदारी मुंबई : मराठा आंदोलक

Maharashtra Pollution Control Board : उद्योग क्षेत्रातील 'लायसन्स राज'ला लगाम

- प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमती शुल्कात कपात; ५ ते २५ वर्षांची रक्कम एकत्रित भरण्याची सोय मुंबई : राज्यातील

Devendra Fadnavis : सुट्या खाद्यतेल विक्रीबाबत 'एसओपी' तयार करा! मुख्यमंत्र्यांची 'एफडीए'ला सूचना

- छोट्या व्यापाऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत मध्यम मार्ग काढण्याचे निर्देश मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Bhuleshwar : १५० मीटरवर मिरवणूक थांबली अन्...; 'भुलेश्वरचा राजा' प्रकरणात धक्कादायक गौप्यस्फोट

मुंबई : ‘भुलेश्वरचा राजा’ गणेशमूर्ती दुर्घटनेच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. २२ फूट उंचीची भव्य

Mumbai Contractor Suicide : धक्कादायक! मुंबईत कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; थकीत बिलांमुळे मानसिक आणि आर्थिक तणाव?

मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गजानन देवकाते नावाच्या कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची घटना

BMC Ganesh Utsav Guidelines : गणेशमूर्तींसाठी ‘फिटनेस प्रमाणपत्र’ अनिवार्य? मुंबई महापालिकेने स्पष्ट केली भूमिका