Friday, May 9, 2025

विदेशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

एलॉन मस्क राजीनामा देणार ?

एलॉन मस्क राजीनामा देणार ?
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू एलॉन मस्क यांनी अमेरिका सरकार करत असलेल्या अनेक खर्चांना कात्री लावली आहे. विविध देशांमध्ये कामं करत असलेल्या कर्मचाऱ्यांना कमी केले आहे. ही प्रक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. अमेरिका किती देशांमध्ये तिथल्या सरकार विरोधात कारवाया करत होती, हे पण मस्क यांच्या धडक कारवाईच्या निमित्ताने उघड झाले आहे. मस्क यांची कारवाई सुरू झाल्यापासून बायडेन आणि त्यांच्यासोबत काम केलेल्या माजी मंत्र्यांची राजकीय कोंडी झाली आहे. ज्यांच्या नेतृत्वाताली कारवाईमुळे एवढा मोठा परिणाम साधला आहे त्या मस्क यांनी राजीनामा देण्याची तयारी सुरू केल्याचे वृत्त आहे. एलॉन मस्क पदाचा राजीनामा देणार असल्याचे वृत्त आहे.



ट्रम्प सत्तेत आले त्यावेळी त्यांच्यासोबत ज्यांनी पदाची शपथ घेतली त्यात मस्क प्रमुख व्यक्ती होते. पण त्यांनी आता राजीनामा देण्याची तयारी सुरू केल्याचे वृत्त आहे. ज्यावेळी मस्क यांनी शपथ घेतली त्याचवेळी ट्रम्प यांनी एक अपवाद म्हणून १३० दिवसांसाठी विशेष व्यवस्था म्हणून ट्रम्प यांनी सरकारी कार्यक्षमता विभागाचे सल्लागार म्हणून मस्क यांची नियुक्ती केली होती. आधीच्या नियोजनानुसार सरकारी कार्यक्षमता विभाग ४ जुलै २०२६ पर्यंत कार्यरत ठेवण्याचे नियोजन करण्यात आले. या विभागाचे सल्लागार म्हणून वर्षभरात किमान १३० दिवस काम करावे लागेल, अशी अट घालून मस्क यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली. पण मस्क यांच्या नेतृत्वात सरकारी कार्यक्षमता विभागाने झपाट्याने काम केले. ही गती ट्रम्प यांनाही अनपेक्षित अशी होती. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनीच स्वतः पुढील दोन - तीन महिन्यांनंतर सरकारी कार्यक्षमता विभाग बंद करुन त्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे इतर सरकारी विभागात स्थलांतर करण्याचे सूतोवाच केले आहे. लवकरच मस्क यांना जबाबदारीतून मुक्त करणार असल्याचे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत.

 
Comments
Add Comment