मुंबई : कंपनीचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी तसेच खर्च कपात करण्यासाठी अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करतात. अशातच बदलत्या तंत्रज्ञानानुसार याचा फटकाही अनेकांना पडत आहे. एआयचे आगमन झाल्यापासून प्रत्येक गोष्ट करणे सहजरित्या सोपे झाले आहे. याचाच फायदा आता अन्न आणि किराणा मालाची डिलिव्हरी करणारी कंपनी झोमॅटो देखील घेणार आहे. परंतु यामुळे कंपनीने नोकरीकपात जाहीर केली आहे. (Zomato layoff)
झोमॅटो खर्चात कपात करत असल्याने कंपनीने कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. झोमॅटोने ६०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. अन्न वितरण व्यवसायाची वाढ कमी होत असताना झोमॅटोने हा निर्णय घेतला आहे. तथापी झोमॅटोने या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यामागील कारणही सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, झोमॅटोने गेल्या वर्षी ZAAP कार्यक्रम सुरू केला, ज्यामध्ये १५०० हून अधिक कर्मचाऱ्यांना सामील करण्यात आले आणि त्यांना एका वर्षात विक्री, ऑपरेशन्स, प्रोग्राम मॅनेजमेंट, पुरवठा साखळी आणि श्रेणी संघांमध्ये पदोन्नती देण्यात आली. बहुतेक कंत्राटी कामगारांचे करार संपल्यानंतर कंपनीने त्यांचे नूतनीकरण केले नाही, ज्यामुळे शेकडो कर्मचारी त्यांच्या नोकऱ्या गमावतील, अशी माहिती समोर आली. (Zomato layoff)
दरम्यान, झोमॅटोच्या कर्मचारी कपातीसंदर्भात झोमॅटोच्या एका कर्मचाऱ्याने ‘त्याला कोणतीही पूर्वसूचना न देता नोकरीवरून काढून टाकण्यात आले’. नंतर कंपनीने त्याला कारण अयोग्य असल्याचे सांगितले. त्यांनी लिहिले की, ‘आज मला झोमॅटोमधून काढून टाकण्यात आले आहे. गेल्या ३ महिन्यांत मी सरासरी २८ मिनिटे उशीरा काम केले होते म्हणून मला काढून टाकण्यात आले.’ त्या व्यक्तीने सांगितले की नोकरीवरून काढून टाकण्यात आलेला तो एकटाच नव्हता – झोमॅटोच्या इतर किमान ३०० कर्मचाऱ्यांनाही नोकरी गमवावी लागली आहे.
झोमॅटोने केलेल्या कपातीवर अनेक कर्मचाऱ्यांकडून कंपनीवर टीका केल्या जात आहेत. कंपनीने कोणत्याही सूचना किंवा अभिप्रायाशिवाय कर्मचाऱ्यांना काढून टाकले आणि उच्च कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही काढून टाकले, असेही या कर्मचाऱ्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. झोमॅटोच्या ग्राहक सेवा स्वयंचलित करण्याच्या प्रयत्नांमुळे या पदांवरील कर्मचाऱ्यांची संख्या कमी होत असल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. (Zomato layoff)
याशिवाय, दुसऱ्या एका कर्मचाऱ्याने म्हटले की, ‘झोमॅटोने आम्हाला करिअर वाढ – पदोन्नती, पगारवाढ, स्थिरता यांचे आश्वासन दिले. आम्ही खूप तास काम केले, कठोर परिश्रम केले, कंपनीवर विश्वास ठेवला. मग अचानक, त्यांनी आमच्यापैकी ५०० हून अधिक लोकांना काढून टाकले. कोणतीही चेतावणी दिली नाही. कोणतीही जबाबदारी नाही.
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…