
पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या आरसीबीची सुरूवात खराब राहिली. दुसऱ्याच ओव्हरमध्ये आरसीबीला विराट कोहलीच्या रूपात पहिला झटका बसला. कोहली केवळ ७ धावा करून बाद झाला. यानंतर तिसऱ्याच षटकांत देवदत्त पड्डिकलला सिराजने बोल्ड केले. ५व्या षटकांत फिल सॉल्टलाही सिराजने बाद केले. ७व्या षटकांत कर्णधार रजत पाटीदारला इशांतने बाद केले.
यानंतर जितेश शर्माने मोर्चा सांभाळला. त्याने ३३ धावांची खेळी केली. मात्र तो १३व्या षटकांत बाद झाला. मात्र यानंतर लिव्हिंगस्टोनने तुफानी खेळी केली. त्याने अर्धशतक ठोकले. तर टीम डेविडनेही शानदार फलंदाजी केली. याच्या जोरावर आरसीबीने २० षटकांत ८ बाद १७० धावा केल्या.