
जेव्हीएलआरवरील ऑबेरॉयच्या जागेत मेट्रो रेल्वेची तिकीट खिडकी, स्टेशन बिल्डिंग, जिना व अन्य सुविधा
खासदार रविंद्र वायकरांनी घेतली प्रलंबित प्रश्नांसाठी के (पूर्व) चे सहायक आयुक्तांसमवेत बैठक
मुंबई : जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील मेट्रो ६ च्या मार्गाचे काम अंदाजे ७० टक्के पूर्ण झाले असून या ठिकाणी श्याम नगर मेट्रो स्टेशन (Shyamnagar Metro station) उभारण्याचा प्रलंबित प्रश्नही निकाली निघाला आहे. आता हे स्टेशन जे.व्ही.एल.आर श्याम नगर सिग्नल जवळच उभारण्यात येणार असून या स्टेशनची तिकीट खिडकी, स्टेशन बिल्डिंग, जिना व अन्य सुविधा ऑबेरॉय विकासकाच्या जागेतच करण्यात येणार आहे. त्याला ऑबेरॉय विकासकाने तयारी दर्शवली आहे. मुंबई उत्तर पश्चिम खासदार रविंद्र वायकर यांनी या व विभागातील अन्य प्रश्नांसंदर्भात बैठेक घेतली होती. त्यावेळी मेट्रोचे अधिकारी यांनी हि माहिती खासदार यांना दिली. तसेच श्याम नगर ते पश्चिम द्रुतगती महामार्ग पर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाचे कामही लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी सूचनाही खासदार यांनी संबंधित अधिकारी यांना दिल्या.
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्नासंदर्भात बैठक घेतली होती. या बैठकीला के (पूर्व) चे सहायक आयुक्त मनीष वळूंज, धुमाळे, सोनावणे, मेट्रोचे अधिकारी जमादार, नवले आदी अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सारीपुतनगर येथे लॉट १२ चे शौचालय बांधणे, निर्मलाताई राजेश्वर रागींणवार मंडईतील अत्यंत खराब व बंद अवस्थे असलेले शौचालय बांधणे, मजासवाडी मनोरमा बिल्डिंगची संरक्षण भिंत कोसळल्याने नाला प्रवाह बंद होऊन मागील वर्षी पावसात झालेल्या नुकसानाबाबत, लोकमान्य टिळक श्याम नगर तलाव, जेव्हीएलआर ओलांडून मजास नाल्यावर बांधलेली पॅरापेट काढून (बोटलनेक) काढून वाहतूक सुरळीत करणे, जोगेश्वरी पूर्व स्टेशन जवळील पादचारी पुलावरील बंद पडलेले सरकते जिने, दत्ताजी साळवी मार्केटची दुरवस्था आदी विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयाच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी ...
यावेळी मेट्रोचे अधिकारी नवले यांनी जेव्हीएलआर ओलांडून मजास नाल्यावर बांधलेली पॅरापेट १४ एप्रिलपर्यंत काढण्यात येईल, असे आश्वासन दिले. रामवाडी ते दत्तटेकडी रस्ता २५ मीटर रुंद करण्यासाठी सध्य येथील रस्त्याची जी टोपोग्राफी आहे त्यानुसार रस्ता तयार करण्यात येणार असून दोन्ही बाजूला एकदिशा मार्ग करण्यात येणार आहे. विकास नियोजनमध्ये दाखवण्यात आलेला काशिनाथ गावकर रोड ते जेव्हीएलआर रस्ता जोडण्याचे कामही लवकर सुरु करण्यात येणार असल्याची माहिती अधिकारी यांनी दिली.

७ एप्रिलपर्यंत प्रवेशद्वार बंद ठेवण्याचा एमएमआरसीचा निर्णय मुंबई : ‘कुलाबा–वांद्रे–सीप्झ मेट्रो ३’मार्गिकेतील आरे–बीकेसी टप्प्यातील विद्यानगरी ...
मेट्रो स्टेशनचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या खालील जागांचे सुशोभिकरण करण्यात यावे, अशी सूचनाही खासदार यांनी यावेळी दिली. मनोरमा बिल्डिंग येथील कोसळलेली नाल्यावरील संरक्षण भिंत मनपाच्या एस डब्लू डी विभागाने बांधावी, अशा सुचना हि खासदार वायकर यांनी संबंधित अधिकार्यांना दिल्या. श्याम नगर मेट्रो स्टेशन उभारणीचा प्रश्न सुटल्याने त्याचे काम लवकरात लवकर सुरु करावे, तसेच श्यामनगर ते पश्चिम द्रुतगती महामार्गपर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी अधिकारी यांनी दिल्या. त्याच बरोबर दत्ताजी साळवी, अंधेरी येथील मार्केटचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला असून तो पुढील अंतिम मंजुरीसाठी मुंबई महानगरपालिका आयुक्त याच्याकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती अभियंता यांनी दिली.