Nilesh Rane : तुमच्यासमोर लहानाचा मोठा झालो, पुन्हा एकत्र यायचं ठरवलंच होतं

  105

शिवसेना आमदार निलेश राणे झाले भावूक


सिंधुदुर्ग : कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार निलेश राणे (Nilesh Rane) कुडाळमधील एका कार्यक्रमादरम्यान कार्यकर्त्यांबद्दल बोलताना भावूक झालेले पाहायला मिळाले. राणे कुटुंबासोबत काम केलेले हे कार्यकर्ते कोणे एके काळी कट्टर विरोधक बनले होते. मात्र त्यांनी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे पुन्हा एकत्र आल्याचे पाहून निलेश राणे यांनी समाधान व्यक्त केले.


मला लहानपणापासून बघितलेली ही सगळी मंडळी आहेत. माझ्याकडे शब्द नाहीत तुमचे आभार मानायला. मी लहानाचा मोठा तुमच्यासमोर झालेलो आहे. माझ्या मनात एकच विचार असायचा, जेव्हा आपण वेगवेगळ्या पक्षांमध्ये होतो, माझ्या मनामध्ये मी एक दिवस ठरवले होते, की कधीतरी एक दिवस असा येईल, जेव्हा परत हे सगळे जण व्यासपीठावर एकत्र येतील, अशा भावना निलेश राणे यांनी व्यक्त केल्या.



शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत


ज्यांच्यासमोर मी लहानाचा मोठा झालो, त्यांनी मला राजकीय संस्कार दिलेत. राणे साहेब यांचे मार्गदर्शन तर आहेच. त्यांनी मला शिकवले ते माझे गुरू आहेतच. संजय पडते, काका कुडाळकर, दत्ता सामंत यांनी मला मोठे केले, त्यांना मी कधीतरी एकत्र आणणार. राणे साहेबांच्या लोकांना मी वेगळ्या आशेने बघायचो, यांना कोणताही त्रास, अडचण होता नये. हे आहेत त्यामुळे आम्ही आहोत. ही भावना मनात घेऊन राजकारणात उतरलो. निलेश राणेंच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत जेवढे काय करायचे, ते मी करणार असे निलेश राणे म्हणाले.



धर्मवीर ज्वाला कार्यक्रमात सहभागी


याआधी, छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांच्या वढू बुद्रुक समाधी स्थळावरून 'धर्मवीर ज्वाला' सिंधुदुर्ग जिल्ह्यात निलेश राणे यांच्या कुडाळ मतदारसंघात येथे आली होती. या कार्यक्रमामध्ये निलेश राणेंनी छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करत हिंदू धर्माची परंपरा, शंभूराजांनी धर्मासाठी दिलेलं बलिदान, त्याग याविषयी भाष्य केले.

Comments
Add Comment

मंत्री नितेश राणे भारतात ५ व्या क्रमांकावर ट्रेंड!

द्विटरवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव मुंबई : राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश नारायण

Audi India: ऑडी इंडियाकडून ऑडी क्‍यू७ सिग्‍नेचर एडिशन लाँच

मुंबई: ऑडी या जर्मन लक्‍झरी कार उत्‍पादक कंपनी (Audi India) ने आज त्‍यांच्‍या फ्लॅगशिप एसयूव्‍हीची एक्‍सक्‍लुसिव्‍ह

Kartiki Gaikwad : लेकाला मांडीवर घेऊन कार्तिकी गायकवाड पार पाडतेय आईचं कर्तव्य, शेअर केला मुलाचा गोड विडिओ

मुंबई : मराठी इंडस्ट्रीतील कार्तिकी गायकवाड नावाजलेली गायिका आहे. कार्तिकी गायकवाडने आजवर अनेक गाणी गायली आहेत.

Gold Silver Rate: सीजफायरनंतर सोन्याचांदीत प्रचंड घसरण! गुंतवणूकदारांना गुंतवणूकीची सुवर्णसंधी 'इतक्याने' झाली दर कपात

प्रतिनिधी: इस्त्राईल व इराण युद्धात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सिझफायर (युद्धबंदी) जाहीर

संजय कपूरचा शेवटचा व्हिडिओ, प्राण वाचवण्याचे डॉक्टरांनी केले होते अनेक प्रयत्न

Sunjay Kapur's Last Video: बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा दिवंगत माजी पती संजय कपूर संबंधित एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, जो

Stock Market Update: ट्रम्प यांच्या Ceasfire नंतर बाजारात उसळीचे रॉकेट! सेन्सेक्स ८७८.४९ व निफ्टी २७१.५० अंकांने उसळला!

प्रतिनिधी: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात सुगीचा काळ सुरु झालेला आहे. अमेरिकन बाजारातील