Nidhi Tewari : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खासगी सचिवपदी निधी तिवारी यांची नियुक्ती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खासगी सचिवपदी निधी तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निधी तिवारी या २०२४ च्या आयएफएस बॅचच्या अधिकारी आहेत. डीओपीटीकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, निधी तिवारी या पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून काम करत होत्या. दरम्यान, आता त्यांचं प्रमोशन झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खासगी सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.



निधी तिवारी २०१४ मध्ये इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये भरती झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी विविध आणि महत्त्वपूर्ण पदांवर काम केलंय. पंतप्रधान कार्यालयातील उपसचिव म्हणून त्यांची सेवा वाखाणण्याजोगी असून, त्यादृष्टीने त्यांना नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. निधी तिवारी यांच्यावर पंतप्रधानांचे खासगी सचिव म्हणून महत्त्वाची जबाबदारी असणार आहे. हे पद सांभाळताना त्यांना पंतप्रधानांच्या दैनंदिन कामात समन्वय, महत्त्वाच्या बैठका आयोजित करणे आणि विविध सरकारी विभागांशी समन्वय साधावा लागणार आहे.

आयएफएस निधी तिवारी यांची नोव्हेंबर २०२२ मध्ये पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. याआधी, त्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात निशस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा प्रकरणांच्या विभागात सचिव म्हणून काम करत होत्या. निधी तिवारीने २०१३ च्या यूपीएससी परीक्षेत केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये ९६ वा क्रमांक मिळवला होता. पहिल्या १०० मध्ये स्थान मिळवल्यामुळे, तिला भारतीय परराष्ट्र सेवा मिळाली. निधीची पहिली पसंती आएफएस होती, त्यानंतर तिने आयएएस आणिआयपीएस होण्याचा मार्ग निवडला होता. आयएफएसमध्ये सामील झाल्यानंतर निधी तिवारी यांनी परराष्ट्र मंत्रालयात आपली सेवा सुरू केली. तेथे त्यांनी निःशस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा प्रकरणांमध्ये सचिव म्हणून काम केले.
Comments
Add Comment

दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र खाद्य महोत्सव

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या खमंग खाद्य पदार्थांचा आस्वाद दिल्लीकरांना मिळावा या उद्देशाने राजधानी दिल्ली

मोदी सरकारचा मोठा निर्णय, पीएमओ आता ‘सेवा तीर्थ’, राजभवन होणार ‘लोक भवन’

नवी दिल्ली : केंद्र सरकार प्रशासकीय रचनेत मोठा बदल करण्याच्या तयारीत असून, सत्ता आणि अधिकार यांची पारंपरिक

भारतीय नौदलप्रमुखांच्या 'त्या' वक्तव्याने पाकिस्तानला भरली धडकी

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर आजही सुरू आहे. सुरक्षेच्या कारणास्तव काही बाबी सार्वजनिक करता येत नाही. पण योग्य ती

Bomb Threat : 'बॉम्ब'च्या धमकीने इंडिगोच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

मुंबई : हैदराबादहून कुवैतकडे जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) एअरलाईन्सच्या एका विमानाला धमकीचा ई-मेल आल्यानंतर मंगळवारी

डिजिटल अरेस्ट घोटाळ्यांची चौकशी सीबीआयकडे द्या: सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाने सायबर गुन्ह्यांशी संबंधित 'डिजिटल अरेस्ट' प्रकरणांच्या

केरळच्या मुख्यमंत्र्यांना ईडीची नोटीस

तिरुवनंतपुरम (वृत्तसंस्था): तिरुवनंतपुरममध्ये केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्यावर नव्या आरोपांची