Tuesday, April 29, 2025

महामुंबईमहाराष्ट्रब्रेकिंग न्यूजराजकीयमहत्वाची बातमी

Chitra Wagh : 'रडत रौत म्हणजे उबाठासेनेचा पोपट'

Chitra Wagh : 'रडत रौत म्हणजे उबाठासेनेचा पोपट' मुंबई : सर्वज्ञानी संजय राऊत म्हणजेच रडत रौत म्हणजे उबाठासेनेचा पोपट झाला आहे, या शब्दात आमदार चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे गटाच्या संजय राऊतांवर टीका केली. उद्धव ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत दररोज सकाळी निवडक पत्रकारांच्या समोर बोलतात. हे पत्रकार राऊतांचे वक्तव्य बातमी म्हणून चालवतात. हा प्रकार मागील काही वर्षांपासून सुरू आहे. विशेष म्हणजे जेव्हापासून हा प्रकार सुरू आहे तेव्हापासून आतापर्यंत उद्धव गटाच्या खासदारांच्या आणि आमदारांच्या संख्येत घट झाली आहे. पक्षाची ताकद कमी होत असली तरी राऊतांचा सकाळी निवडक पत्रकारांसमोर बोलण्याचा शिस्ता अजून मोडलेला नाही. या पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी राऊतांवर सडकून टीका केली. उद्धव गटाच्या पाळलेल्या पोपटाने भाकड भविष्य सांगण्यास सुरुवात केली आहे. हा उपक्रम हाती घेण्याऐवजी राऊत अर्थात स्वयं घोषित विश्वगुरुने स्वतःच्या घराकडे आधी लक्ष द्यावे, असे चित्रा वाघ यांनी सुनावले. 'भारतीय जनता पार्टी , प्रधानमंत्री मोदीजी वगैरेंवर बोलण्याची एकतर त्यांची कुवत नाही… आणि तुमच्या विश्लेषणाची आमच्या पक्षाला गरजही नाही. भारतीय जनता पार्टीचा पुढचा वारसदार वगैरेच्या गोष्टी बोलण्यापेक्षा जरा स्वतःच्या पक्षाला माफ करा गटाला पडलेलं खिंडार सांभाळा…' या शब्दात चित्रा वाघ यांनी राऊत नावाच्या व्यक्तीला त्याची पातळी दाखवून दिली. उद्धव ठाकरे यांना विधानपरिषद आमदार असल्याचे भान राखावे, विसर पडू देऊ नये. नाहीतर पक्षाचे अस्तित्व उरणार नाही; असा इशारा चित्र वाघ यांनी उद्धव गटाला दिला.
Comments
Add Comment