बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांना अडकवण्यासाठी एका महिलेला तयार करण्यात आले होते, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केला आहे. या महिलेची सात-आठ दिवसांपूर्वी हत्या झाल्याची माहिती समोर येत असून, या प्रकरणाने बीडमध्ये खळबळ उडाली आहे.
गुरुवार (२७ मार्च २०२५) रोजी बीडमधील कळंब शहरातील द्वारका नगरी वसाहतीत एका महिलेचा मृतदेह घरात सडलेल्या अवस्थेत आढळला. या महिलेने वेगवेगळ्या “मनीषा आकुसकर”, “मनीषा बिडवे”, “मनीषा बियाणी” आणि “मनीषा गोंदवले” या नावांनी आपली ओळख बदलून विविध ठिकाणी वावर केला होता.
सदर महिला सुदर्शन घुलेच्या संपर्कात होती आणि संतोष देशमुख यांच्याविरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी तयार होती, अशी चर्चाही रंगली आहे. मात्र, या दाव्याला अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
सदर महिलेला ठार मारण्यामागे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील धागेदोरे नष्ट करण्याचा डाव आहे की तिचा मृत्यू अनैतिक संबंधातून झाला? हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. बीड पोलिसांना ही माहिती उशिराने मिळाली आणि पोलिसांनी घरात प्रवेश केल्यानंतर महिलेचा मृतदेह पूर्णतः सडलेला आढळला.
बीड पोलिसांनी घटनास्थळीच शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार उरकले असून, या हत्येचा सखोल तपास सुरू आहे. शहरात घडलेल्या या घटनेने भय आणि तर्कवितर्कांना उधाण आले असून, पोलिस तपासातूनच आता खरी माहिती समोर येईल, असे बोलले जात आहे.
ही महिला अनेक पुरुषांना अडकवण्याचे काम करायची आणि त्यासाठी ती खाली दिलेल्या नावांचा वापर करायची
मुंबई : प्रभादेवी – कुरणे चौक मार्गावरील बेस्टच्या बस क्रमांक १६७ मधून प्रवास करत असलेल्या…
नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेक परदेशी दौरे करतात. या दरम्यान ते…
आफ्रिकेच्या सर्वात मोठा तंत्रज्ञान आणि स्टार्टअप शो नवी दिल्ली : गिटेक्स या आफ्रिकेच्या सर्वात मोठ्या…
दिल्लीतल्या गाजलेल्या खटल्यावर आधारित नवीन वेब सिरीज नवी दिल्ली : अभिनेता अली फजल आणि अभिनेत्री…
नाशिक : नाशिक - पुणे मार्गावरील काठे गल्ली सिग्नलजवळ असलेल्या अनधिकृत दर्ग्यावर महापालिका प्रशासनाने कारवाई…
मुंबई : जेईई च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. जेईई मेन सत्र २ची २ ते ८ एप्रिल…