Dr. Girija Vyas takes over the charge of Union Minister for Housing & Urban Poverty Alleviation, in New Delhi on June 18, 2013.
उदयपूर : राजस्थानमधील उदयपूरच्या काँग्रेस नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. गिरिजा व्यास भाजल्यामुळे गंभीर जखमी झाल्या आहेत. घरात पूजा करत असताना ओढणीचा स्पर्श दिव्याला झाला. ओढणीने पेट घेतला आणि जाणीव होण्याआधीच डॉ. गिरिजा व्यास भाजल्यामुळे गंभीर जखमी झाल्या. डॉ. गिरिजा व्यास यांना तातडीने उदयपूर येथील अमेरिकन रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्यांना अहमदाबादला नेण्यात आले.
डॉ. गिरिजा व्यास यांचे बंधू भाई गोपाल शर्मा यांनी घटनेची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. घटना घडली त्यावेळी भाई गोपाल शर्मा फार्म हाऊसवर गेले होते आणि त्यांची बहीण घरीच होती. घरातच पूजा करतेवेळी डॉ. गिरिजा व्यास भाजल्यामुळे गंभीर जखमी झाल्या. घरातील नोकराने डॉ. गिरिजा व्यास यांना रुग्णालयात नेले आणि भाई गोपाल शर्मा यांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच तातडीने परतलेले भाई गोपाल शर्मा यांनी डॉक्टरांनी भेटून डॉ. गिरिजा व्यास यांच्या तब्येतीबाबत माहिती घेतली. नंतर डॉ. गिरिजा व्यास यांना अहमदाबादला नेण्याचा निर्णय झाला. नातलगांनीच परस्पर सहमतीने डॉ. गिरिजा व्यास यांना अहमदाबादला नेले.
कोण आहेत डॉ. गिरिजा व्यास ?
जन्म : ८ जुलै १९४६
१९८५ – उदयपूरच्या काँग्रेस आमदार
१९९१ – उदयपूरच्या काँग्रेस खासदार आणि नरसिंह राव सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण खात्याच्या उपमंत्री
१९९३ – अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष
१९९३ – १९९६ – पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सल्लागार समितीच्या सदस्य, गृह आणि परराष्ट्र व्यवहार स्थायी समितीच्या सदस्य
१९९६ – दुसऱ्यांदा खासदार
१९९६ – राजभाषा समितीच्या सदस्य, महिला सक्षमीकरण समितीच्या सदस्य, पेट्रोलियम स्थायी समितीच्या सदस्य, गृह मंत्रालयाच्या सल्लागार समितीच्या सदस्य
१९९९ – तिसऱ्यांदा खासदार
१९९९ – २००० – पेट्रोलियम आणि रसायने समितीच्या सदस्य
२००१ – २००४ – राजस्थान प्रांतिक काँग्रेस समितीच्या अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या मीडिया विभागाच्या अध्यक्ष आणि इंडो-ईयू सिव्हिल सोसायटीच्या सदस्य
२००५ – २०११ – राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष
२००८ – राजस्थान विधानसभेच्या आमदार
२०१३ – गृहनिर्माण आणि शहरी दारिद्र्य निर्मूलन मंत्री
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…