धक्कादायक घटना, एसी कंटेनरमधून ५७ टन गोमांस जप्त

लोणावळा : मुंबई - पुणे एक्सप्रेस वे वर लोणावळ्याजवळील कुसगावच्या हद्दीत दोन एसी कंटेनर पकडण्यात आले. या कंटेनरची तपासणी केली असता त्यातून गोमांसाची वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी दोन एसी कंटेनरमधून एकूण ५७ टन गोमांस जप्त केले. या प्रकरणी सिकंदराबाद, हैदराबाद येथील मेसर्स एशियन फूडस मीम अॅग्रो कंपनीच्या मालकासह दोन्ही कंटेनरच्या चालकांच्या विरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात बेकायदा गोमांस विक्री आणि वाहतूक करणे तसेच बनावट कागदपत्रांद्वारे गोमांस नसल्याचे दर्शवून फसवणूक करणे हे आरोप ठेवून एफआयआर नोंदवण्यात आली आहे.



हैदराबाद, तेलंगण येथून सुमारे ५७ टन गोमांस न्हावाशेवा पोर्ट, नवी मुंबई येथे विक्रीसाठी नेले जात होते. गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीने हा प्रयत्न हाणून पाडला. या प्रकरणात मेसर्स एशियन फूडस मीम अॅग्रो कंपनीचा मालक महंमद सादिक कुरेशी (रा. हैदराबाद, तेलंगण), कंटेनरचालक नदीम कलीम अहमद आणि नसीर महंमद अहमद (दोघेही रा. न्हावाशेवा, नवी मुंबई) यांच्या विरोधात लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आली आहे. लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे यांनी फिर्याद दिली आहे.



पोलिसांच्या उपस्थितीत पशुवैद्यकीय अधिकारी अनिल परंडवाल यांनी दोन्ही कंटेनरमधील प्रत्येकी दहा असे एकूण २० बॉक्स तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. या नमुन्यांच्या तपासणीचा अहवाल आल्यानंतर कायद्यानुसार पोलीस पुढील कारवाई करणार आहेत. लोणावळा ग्रामीण पोलीस तपास करत आहेत.
Comments
Add Comment

पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला प्रारंभ, २४ तास दर्शनाची सुविधा!

पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भक्तीच्या

नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेले मराठवाड्याचे प्राध्यापक येताना पत्नीसह भीषण अपघात दगावले...

पुणे : छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात विद्यापीठाचे निवृत्त

पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार

भाजप-अजित पवार गट आमने-सामने पिंपरी : महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचा फलटण दौरा

सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक झाली आहे.

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यासपीठावर मनोज जरांगे येणार का?

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे