Sikandar : सलमान खानला धक्का! सिकंदर रिलीज होताच झाला ऑनलाइन लीक


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सलमान खानच्या 'सिकंदर' (Sikandar) चित्रपटाची चर्चा सुरु होती. अखेर आज ३० मार्च रोजी सलमान खानचा बहुप्रतीक्षित ॲक्शन एंटरटेनर 'सिकंदर' प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या सिनेमाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र चित्रपटाचे रेटिंग कमी असल्यामुळे सिकंदर हीट होणार का असा प्रश्न पडत असताना सलमान खानला या चित्रपटामुळे धक्का बसला असल्याचीमाहिती समोर आली आहे.




२०१७मध्ये प्रदर्शित झालेला ‘टायगर जिंदा है’ हा सलमानचा शेवटचा हिट सिनेमा होता. त्यानंतर त्याने सतत फ्लॉप सिनेमे दिले आहेत. त्यामुळे सध्या चाहत्यांना ‘सिकंदर’ या सिनेमाकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र ट्विटरवर रिव्ह्यू पाहता सिनेमा फ्लॉप होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. त्तपूर्वी सलमान खान आणि रश्मिका मंदाना यांचा चित्रपट 'सिकंदर' रिलीज होताच फुल एचडी क्वालिटीमध्ये ऑनलाइन लीक झाला आहे. 'सिकंदर डाउनलोड मूव्ही' आज गुगलवर सर्वाधिक सर्च केला जात आहे. हा चित्रपट तमिलरॉकर्स, मूवीरुलज, फिल्मीजिला आणि टेलिग्राम ग्रुप सारख्या प्लॅटफॉर्मवर मोफत पाहण्यासाठी उपलब्ध झाला आहे. या वेबसाइट्सवर चित्रपटाचे अवैध डाउनलोड आणि स्ट्रीमिंग लिंक्स दिले आहेत.



कठोर अँटी-पायरेसी कायदे आणि अवैध स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर सतत कारवाई होऊनही पायरसी बॉलीवूडसाठी एक मोठी समस्या राहिली आहे. दरम्यान, आता चित्रपट ऑनलाईन लीक झाल्यामुळे याचा बॉक्स ऑफिसवर फटका बसणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.


‘सिकंदर’चे डायरेक्शन ए आर मुरुगादॉस यांनी केले आहे. चित्रपटात सलमान खानव्यतिरिक्त रश्मिका मंदाना, प्रतीक बब्बर आणि शरमन जोशी यांसारख्या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. काही चाहत्यांनी सोशल मीडियावर चित्रपटाला ब्लॉकबस्टर आणि पैसा वसूल असे संबोधले आहे. त्यामुळे 'सिकंदर' किती कमाई करणार आणि सलमान खानसाठी हा चित्रपट मोठा ओपनर ठरणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
Comments
Add Comment

सुपरस्टार थलापती विजयचा राजकारणासाठी फिल्मइंडस्ट्रीला रामराम; माझ्यासाठी महत्वाचे आहे कि....

मुंबई : दक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार थलापती विजयने अभिनय क्षेत्रातून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतला

अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

हैदराबाद : 'झुकेगा नही' म्हणणारा अभिनेता कायदेशीर पेचात अडकला आहे. गेल्या वर्षी हैदराबादमध्ये 'पुष्पा २'च्या

दीपिकाच्या रंगावर प्रश्नचिन्ह? ध्रुव राठीच्या व्हिडीओने उडवली बॉलीवूडमध्ये खळबळ

मुंबई : गोरे रंग पे ना इतना गुमान कर…’ हे गाणं अनेकांना परिचित आहे. मात्र सध्या बॉलीवूडमधील गोऱ्या रंगामागचं

तरुणाईत अक्षय खन्नाची क्रेझ, चाहत्यांसाठी २०२५ ठरले खास

मागील अनेक वर्षांपासून बॉलिवूड विश्वात एक चेहरा सक्रिय आहे. मात्र त्याच्या आजवरच्या भुमिकांमुळे तो चर्चेत आला

वेब सीरिज विश्वातील २०२५ चा नवा चेहरा, लक्षवेधी ठरलेला 'जयदीप'!

भारतीय वेब सिरीज वर्षानुवर्षे वेगाने वाढत आहेत. चित्रपट, नाटकांप्रमाणेच वेब सिरीज आता भारतीयांच्या मनोरंजनाचा

सलमान खानचा ‘बॅटल ऑफ गलवान’ — जिद्द आणि शौर्याची अढळ कहाणी

सलमान खानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’ — हिम्मत आणि वीरतेने सजलेली गौरवाची कहाणी, टीझर झाला रिलीज आपल्या वाढदिवसाच्या