KGF fame Yash's बहुप्रतीक्षित ‘टॉक्सिक’ची रिलीज तारीख पुढे ढकलली; या तारखेला उघडणार पडदा

मुंबई : कन्नड स्टार यशच्या बहुचर्चित ‘टॉक्सिक: ए फेरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ या चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. जगभर १९ मार्चला प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आलेला हा सिनेमा आता त्या तारखेला थिएटरमध्ये येणार नाही.


‘रॉकी भाई’च्या कमबॅकची चार वर्षांपासून रंगलेली चर्चा चाहत्यांना पुन्हा प्रतीक्षा करायला लावणारी ठरली आहे.



जागतिक तणावाचा फटका


निर्मात्यांच्या मते, मध्यपूर्वेतील अस्थिर वातावरण आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणावाचा परिणाम वितरणावर होण्याची शक्यता आहे. ‘टॉक्सिक’ हा चित्रपट जागतिक बाजारपेठ डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आला आहे.


कन्नडसोबतच इंग्रजी भाषेतही शूटिंग करण्यात आल्याने परदेशातील प्रदर्शनाला विशेष महत्त्व होते. मात्र सध्याच्या परिस्थितीत जागतिक रिलीज करणे धोकादायक ठरू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.



यशची अधिकृत भूमिका


सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधताना यशने स्पष्ट केले की, प्रेक्षक आणि वितरण भागीदारांचे हित लक्षात घेऊन प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. नवीन नियोजनानुसार हा हाय-ऑक्टेन ॲक्शन ड्रामा आता ४ जून २०२६ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.



दमदार स्टारकास्ट


दिग्दर्शक गीतू मोहनदास यांच्या या चित्रपटात गीतू मोहनदास दिग्दर्शित या चित्रपटात नयनतारा, कियारा अडवाणी, हुमा कुरेशी आणि तारा सुतारिया यांसारखी तगडी कलाकार फळी झळकणार आहे.



‘धुरंधर २’ला सोलो रिलीजचा फायदा?


‘टॉक्सिक’ शर्यतीतून बाहेर पडल्याने १९ मार्चला प्रदर्शित होणाऱ्या धुरंधर २ ला थेट फायदा होण्याची शक्यता आहे. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा हा स्पाय थ्रिलर आता स्पर्धेशिवाय थिएटरमध्ये उतरणार आहे. मोठ्या चित्रपटाची टक्कर टळल्याने बॉक्स ऑफिसवर एकहाती कमाईची संधी निर्माण झाल्याचे चर्चा सुरु आहे.



चाहत्यांची नजर जूनकडे


सध्या ‘टॉक्सिक’च्या नव्या रिलीज डेटची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, पुढील काही महिन्यांत प्रमोशनचा वेग वाढवला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, मार्चमध्ये बॉक्स ऑफिसवर ‘धुरंधर २’चा दबदबा राहणार का, याकडे चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Lock Upp : 'लॉक अप सीझन २'ची विजेती श्रेया कालराचा मोठा निर्णय; १ कोटींच्या प्राइझ मनीबाबत केली मोठी घोषणा

ओटीटीवरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिॲलिटी शो 'लॉक अप सीझन २'चा नुकताच ग्रँड फिनाले पार पडला आहे. बुधवारी झालेल्या

Saif Ali Khan : ५० व्या वर्षीही अविवाहित असलेली सैफ अली खानची बहीण सबा पटौदीचा लग्नाबद्धल मोठा खुलासा!

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान (Saif ali Khan) आणि अभिनेत्री सोहा अली खान (Soha Ali Khan) यांची मोठी बहीण सबा पटौदी (Saba Pataudi) नेहमीच

Amitabh Bachchan : स्पर्धकांशी गप्पा मारताना सांगितले अनेक अनुभव

अमिताभ बच्चन हे एक भारतीय चित्रपट निर्माते, अभिनेते, दूरदर्शन सूत्रसंचालक, आणि माजी राजकारणी आहेत. ते त्यांच्या

Amitabh Bachchan : "शूट चुकवलं असतं तर माझी..."; KBC साठी सलग २४ तास काम! ८३ व्या वर्षीही अमिताभ बच्चन यांच्या जिद्दीला सलाम

मुंबई : वयाच्या ८३व्या वर्षीही बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आपल्या कामाप्रती असलेली निष्ठा आणि शिस्त

Salman Khan : सलमान खानवर कोट्यवधींच्या फसवणुकीचा आरोप! ‘बीइंग ह्युमन’ ज्वेलरी प्रकरणात कोर्टाचे समन्स; जाणून घ्या ३ कोटींच्या गुंतवणुकीचा वाद नेमका काय?

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कारण आहे ‘बीइंग ह्युमन’ (Being Human)

Ted Sarandos Meets PM Modi : Netflix ची भारतासाठी मोठी घोषणा! देश बनणार ‘ग्लोबल कंटेंट क्रिएशन हब’; टेड सारंडोस यांनी घेतली PM मोदींची भेट

नवी दिल्ली : भारतातील नेटफ्लिक्सच्या (Netflix) प्रवासाला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कंपनीचे सह-मुख्य