नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (ता.३०) येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट देणार आहेत. या भेटीचे विशेष म्हणजे पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी अनेकदा नागपूर आणि परिसरातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावली व दीक्षाभूमीलाही भेट दिली.मात्र, संघ मुख्यालय किंवा रेशीमबाग येथील स्मृतीमंदिराला भेट दिली नव्हती. यावेळी माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर तब्बल ११ वर्षांनी रेशीमबाग येथील स्मृतीमंदिराला भेट देणार आहेत.
भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अतूट नाते आहे. संघाच्या विचारधारेतून अनेक स्वयंसेवक पुढे भाजपमध्ये प्रवेश करीत राजकारणात सक्रिय झाले. आजही भाजपच्या संघटन मंत्रिपदाची जबाबदारी संघाकडूनच दिली जाते. स्वतः नरेंद्र मोदी हे संघाचे एकेकाळी प्रचारक होते. मात्र, पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी विविध धार्मिक आणि सामाजिक संस्थांना भेटी दिल्या असल्या तरी नागपूरच्या संघ मुख्यालयात आले नव्हते. दर तीन वर्षांनी संघाच्या नागपुरातील प्रतिनिधीसभेला गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहतात. विजयादशमी उत्सव आणि तृतीय वर्ष संघ शिक्षावर्गाचा समारोपीय कार्यक्रम हे संघाचे दोन प्रमुख वार्षिक कार्यक्रम आहेत. त्यात विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहतात.
पंतप्रधान झाल्यापासून मोदींनी या संघटनात्मक कार्यक्रमांना आणि संघ मुख्यालयाला दूर ठेवण्याची भूमिका घेतल्याचे दिसत होते. आता, ३० मार्चला स्मृतीमंदिराला त्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी दीक्षाभूमीलाही भेट दिली होती. मात्र, त्यांनी स्मृतीमंदिर स्थळी जाणे टाळले होते. अखेर ३० मार्च रोजी मोदी स्मृतीमंदिराला भेट देणार आहेत. त्यामुळे राजकीय तर्कवितर्कावरून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
नाशकात दुपारी १ ते ४ दरम्यान ट्रॅफिक सिग्नल राहणार बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय! नाशिक :…
नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा पाऊस मुंबई: सध्या मराठी कलाविश्वात सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ या लावणीची जोरदार…
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देण्याचे तसेच गहिनीनाथ गडाला…
निरोगी त्वचा असणे ही सर्वांचीच इच्छा असते. मात्र, निरोगी आणि सुंदर दिसणाऱ्या त्वचेची योग्य काळजी…
पुणे : चितळे प्रकरण ताजे असतानाच पुण्यामध्ये ब्रँडेड कंपन्यांच्या नावे बनावट कपडे विकल्याची माहिती समोर…
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी (Bell's palsy) हा आजार झाला…