नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुरातील दीक्षाभूमीला दुसऱ्यांदा भेट दिली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
दीक्षाभूमी येथे नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना बाबासाहेबांच्या सामाजिक समता आणि न्यायाच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, ‘बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंचतीर्थांपैकी एक असलेल्या नागपूरच्या दीक्षाभूमीवर येण्याचे भाग्य मला लाभले, याचा मला अभिमान वाटतो. या पवित्र स्थळी बाबासाहेबांच्या समता, न्याय आणि सामाजिक ऐक्याच्या विचारांचे प्रतिबिंब दिसते. दीक्षाभूमी गरीब, वंचित आणि गरजूंसाठी समान अधिकार आणि न्यायाची प्रेरणा देणारी आहे. अमृतकालाच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर आपण बाबासाहेबांच्या विचारांवर चालत देशाला नव्या प्रगतीच्या शिखरावर पोहोचवू. एक विकसित आणि समावेशी भारत निर्माण करणे हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल.’
याआधी संघ मुख्यालयात जाऊन पंतप्रधान मोदींनी स्मृती मंदिराला भेट दिली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्थापकांना आदरांजली वाहिली. डॉ. हेडगेवार आणि संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी या दोघांची स्मारके नागपूरच्या रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिरात आहेत. स्मृती मंदिरात आदरांजली वाहून पंतप्रधान मोदींनी तिथल्या अभ्यागत पुस्तिकेत संदेश लिहून स्वाक्षरी केली.
डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्य आधारस्तंभ आणि भारतीय जनता पार्टीचे वैचारिक पालक असल्याचे पंतप्रधान मोदींनी अभ्यागत पुस्तिकेत नमूद केले. अभ्यागत पुस्तिकेत पुढे मोदींनी डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी हे संघाच्या स्वयंसेवकांसाठी उर्जेचा स्रोत असल्याचेही नमूद केले.
नाशकात दुपारी १ ते ४ दरम्यान ट्रॅफिक सिग्नल राहणार बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय! नाशिक :…
नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा पाऊस मुंबई: सध्या मराठी कलाविश्वात सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ या लावणीची जोरदार…
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देण्याचे तसेच गहिनीनाथ गडाला…
निरोगी त्वचा असणे ही सर्वांचीच इच्छा असते. मात्र, निरोगी आणि सुंदर दिसणाऱ्या त्वचेची योग्य काळजी…
पुणे : चितळे प्रकरण ताजे असतानाच पुण्यामध्ये ब्रँडेड कंपन्यांच्या नावे बनावट कपडे विकल्याची माहिती समोर…
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी (Bell's palsy) हा आजार झाला…