Railway Accident : बंगळुरू - कामाख्या एक्सप्रेस घसरली, रुळावरुन ११ डबे उतरले

नवी दिल्ली : ओडिशातील कटक जिल्ह्यात बंगळुरू - कामाख्या एसी सुपरफास्ट एक्सप्रेसचे ११ डबे रुळावरुन खाली घसरले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आणि सात जण जखमी झाले. मदतकार्य सुरू आहे. अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने हेल्पलाईन क्रमांक जाहीर केले आहेत.



जखमींवर एससीबी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.



खुर्दा रोड विभागांतर्गत कटक - नारगुंडी रेल्वे विभागातील नारगुंडी स्थानकाजवळ रविवार ३० मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजून ५४ मिनिटांनी अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.



प्रशासनाने पूर्व विभागातील रेल्वे वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याचे काम हाती घेतले आहे. तंत्रज्ञांच्या मदतीने रुळ दुरुस्त करुन रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हेल्पलाईन क्रमांक : ८४५५८८५९९९ आणि ८९९११२४२३८
Comments
Add Comment

NSG in Ayodhya : अयोध्येत NSG चे सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार

अयोध्या : उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येत NSG चे (National Security Guard) सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

105 indians missing nepal flood : नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार : १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता; मानसरोवर यात्रेकरूंचाही समावेश, बचावकार्य तीव्र

काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal Flood) आलेल्या भीषण महापुरामुळे प्रचंड प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे. या नैसर्गिक

India 1500 km missile Private Company : संरक्षण क्षेत्रात मोठा निर्णय : मोदी सरकारकडून १५०० किमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्र निर्मितीसाठी खासगी कंपन्यांना हिरवा कंदील!

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण क्षमतेला अधिक मजबूत करण्यासाठी मोदी सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. संरक्षण

Women's Equality Day : जाणून घ्या २६ ऑगस्ट 'महिला समानता दिन' म्हणून का साजरा केला जातो?

मुंबई : २६ ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पण हा दिवस फक्त महिलांना मिळालेली समानता

‘Misuse of powers’: राजस्थान उच्च न्यायालयात वादळ! प्रभारी मुख्य न्यायमूर्तींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; SC चे न्यायमूर्ती संदीप मेहता यांचे सरन्यायाधीशांना पत्र

नवी दिल्ली : राजस्थान उच्च न्यायालयातील अंतर्गत वाद आणि गैरव्यवहाराचे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या

Chhattisgarh Social Boycott : एकाच गावातील ३१ जणांचा सामाजिक बहिष्कार; ७ लहान मुलांचाही समावेश, अतिक्रमणाच्या आरोपाची शिक्षा?

धमतरी : छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील तर्रागोंदी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील तब्बल ३१