नवी दिल्ली : ओडिशातील कटक जिल्ह्यात बंगळुरू – कामाख्या एसी सुपरफास्ट एक्सप्रेसचे ११ डबे रुळावरुन खाली घसरले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आणि सात जण जखमी झाले. मदतकार्य सुरू आहे. अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने हेल्पलाईन क्रमांक जाहीर केले आहेत.
जखमींवर एससीबी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
खुर्दा रोड विभागांतर्गत कटक – नारगुंडी रेल्वे विभागातील नारगुंडी स्थानकाजवळ रविवार ३० मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजून ५४ मिनिटांनी अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.
प्रशासनाने पूर्व विभागातील रेल्वे वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याचे काम हाती घेतले आहे. तंत्रज्ञांच्या मदतीने रुळ दुरुस्त करुन रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
हेल्पलाईन क्रमांक : ८४५५८८५९९९ आणि ८९९११२४२३८
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ३४व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सामना पंजाब किंग्सशी आहे.…
नवी दिल्ली : आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा ठरला आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाला…
घाटकोपर मध्ये हिंदी माध्यमातील पाठ्यपुस्तके जाळून मनसेने केला निषेध मुंबई : हिंदी भाषा सक्ती विरोधात…
या प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक यांचीही चौकशी करा कुडाळ : वैभव नाईक जेव्हा आमदार…
नवी मुंबई : प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांव्दारे एकल वापरातील प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास…
मुंबई : राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात…