

Earthquake: म्यानमार भूकंपामध्ये मृ्त्यूमुखी पडलेल्यांची संख्या १६००वर
नवी दिल्ली: म्यानमार आणि थायलंडमध्ये शुक्रवारी आलेल्या भूकंपाने मोठा हाहाकार माजवला आहे. शनिवारीही भूकंपाचे झटके जाणवले. शनिवारी दुपारी भूकंपाची ...
आयपीएस सुधाकर पठारे यांच्यावर सध्या मुंबई पोलिसात पोर्ट झोनचे डीसीपी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. पठारे हे काही काळापूर्वी ट्रेनिंगसाठी हैदराबादमध्ये गेले होते. तिथं त्यांच्या एका नातेवाईकासह ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला. अपघातात सुधाकर पठारे यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक असलेल्या भागवत खोडके यांचाही मृत्यू झाला.
सुधाकर पठार हे स्पर्धा परीक्षा देत असताना १९९५ साली जिल्हा विशेष लेखा परीक्षक झाले. यानंतर १९९६ मध्ये विक्रीकर अधिकारी वर्ग म्हणून त्यांची निवड झाली. तसंच नंतर १९९८ साली पोलिस उपअधीक्षक म्हणून त्यांची निवड झाल्यानंतर पोलिस खात्यातच ते रमले. आतापर्यंत त्यांनी पोलिस उपअधीक्षक म्हणून पंढरपूर, अकलूज, कोल्हापूर शहर, राजुरा येथे काम केले आहे.