मुंबई : लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची मनोरंजन क्षेत्रातील आवडती मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. ही मालिका गेली १६ वर्ष प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आली आहे. या मालिकेतील पात्रांनी प्रेक्षकांचं मन अल्पावधीतच जिंकलं. मात्र या मालिकेतील ‘दयाबेन’ म्हणजेच दिशा वाकानी काही कारणास्तव मालिकेत दिसलीच नाही. मात्र आता ‘दयाबेन’ पुन्हा मालिकेत दिसणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील दिशा वाकानी हिने मालिका सोडल्यानंतर मध्यंतरी या मालिकेचे दिग्दर्शक असित मोदीने दिशा वाकानी पुन्हा दयाबेन म्हणून परत काम करणार असल्याचं म्हटलं होत. मात्र त्याच्या प्रयत्नांना अपयश आल्याने अजूनही या मालिकेत दयाबेनची जागा कोणीही घेतलेली नाही. त्यासाठी असित मोदीने अनेक महिला कलाकारांचे ऑडिशन घेतले परंतु दयाबेनच्या पात्राला न्याय देणारी कलाकार त्यांना सापडतच नव्हती. मात्र आता दिशा वाकानीच्या जागी दयाबेन पात्र साकारणारी नवीन कलाकार येणार असल्याची चर्चा सुरु आहे. या अभिनेत्रीची अद्यापही ओळख उघड झाली नसून गेल्या एका आठवड्यापासून तिचं टीमसोबत शूटिंग सुरु आहे. दरम्यान आता दयाबेनच्या पात्र साकारणारी अभिनेत्री नेमकी कोण असेल याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…