
मालवण : निवती रॉक समुद्रात पर्यटनासाठी स्थापित करण्यात येणारी गुलदार युद्धनौका कुणकेश्वराच्या समुद्रात स्थापित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे. दरम्यान, गेली सात वर्ष वाट पाहत असलेल्या वेंगुर्ला आणि मालवण येथील पर्यटन व्यावसायिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रकार असल्याच्या प्रतिक्रिया येथील पर्यटन व्यावसायिकांमधून उमटू लागल्या आहेत. मालवण आणि वेंगुर्ला परिसरात भोगवे, निवती, देवबाग, तारकर्ली, मालवण, तोंडवळी या भागात मोठ्या प्रमाणावर पर्यटनवाढीस वाव आहे. या भागातील पर्यटनाला जागतिक दर्जा मिळावा यासाठी येथे एखादा नावीन्य पूर्ण प्रकल्प उभारण्यात यावा, अशी येथील पर्यटन व्यावसायिकांची मागील १०-१२ वर्षांपासूनची मागणी होती.

४ एप्रिल २०२५ पासून मुंबईकरांची लूट होणार बंद मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि ‘स्वच्छ मुंबई अभियान’अंतर्गत मुंबईत ...
याच मागणीचा विचार करता निवती रॉक समुद्रात नौदलाची निवृत्त युद्धनौका स्थापित करून तिथे पाणबुडी प्रकल्प राबविण्याची संकल्पना मांडण्यात आली होती. मागील सहा-सात वर्षे पाठपुरावा केल्यानंतर अखेर नौदलाची निवृत्त युद्धनौका आयएनएस गुलदार आणि पाणबुडी प्रकल्पाला केंद्राने निधीची तरतूद करत हिरवा कंदील
दाखविला होता.