मुंबई : इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन मीच केला होता, अशी कबुली प्रशांत कोरटकरने पोलिसांसमोर दिली. खरे तर इंद्रजित सावंतांना केलेल्या धमकीच्या फोन कॉलमध्येच कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. २५ फेब्रुवारीला प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी देणारा फोन केला व फोन कॉलमध्ये त्याने छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये केली.
Disha Salian Case : “दिशा सालियनच्या मृत्यूमागे आदित्य ठाकरे आणि सेलिब्रेटींचे ड्रग्ज रॅकेट”
मोबाईलमधील डेटाही डिलिट केल्याचे मान्य
तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत असताना कोल्हापूर पोलिसांनी खाक्या दाखवताच कोरटकरने आपण इंद्रजित सावंतांना फोन केल्याचे मान्य केले. महिनाभर फरार असलेला कोरटकर २४ मार्चला तेलंगणात कोल्हापूर पोलिसांच्या हाती लागला. त्याला २५ मार्चला अटक दाखवून कोर्टात हजर करण्यात आलं. तिथे त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्याने इंद्रजित सावंतांना फोन केल्याची कबुली दिली असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक टिप्पणी केल्याचाही आरोप खरा ठरण्याची शक्यता आहे.