प्रशांत कोरटकरला दोन दिवसांची पोलीस कोठडी

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याप्रकरणी अटक केलेल्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाने आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. सध्या पोलीस कोठडीतच असलेल्या प्रशांत कोरटकरचा पोलिसांकडचा ताबा आणखी दोन दिवसांनी वाढला आहे.



अटक केल्यानंतर प्रशांत कोरटकरला पोलीस कोठडीची मागणी करण्यासाठी पहिल्यांदा पोलिसांनी कोल्हापूर न्यायालयात हजर केले होते. त्या दिवशी एका छत्रपती शिवाजी महाराजप्रेमी व्यक्तीने कोरटकर कोल्हापुरी चप्पल उगारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. तर यावेळी न्यायालयाच्या आवारात एका वकिलानेच कोरटकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. शिवाजी महाराजांची बदनामी करतोस का, असा सवाल करत अमित भोसले नावाच्या वकिलाने कोरटकरवर झडप घातली. पोलिसांनी त्यांना दूर केले. यानंतर कोरटकर जवळ आणखी पोलीस उभे राहिले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.



छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्यानंतर फरार झालेल्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणातील एका काँग्रेस पदाधिकार्‍याच्या घरातून अटक केली. यानंतर कोरटकरला कोल्हापूरमध्ये आणण्यात आले. सध्या कोरटकर पोलीस कोठडीत आहे.
Comments
Add Comment

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह