ठाणे : मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार आहेत. त्यानुसार कल्याण व भांडुप परिमंडलांतर्गत सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवार, रविवार आणि सोमवारी (२९ ते ३१ मार्च) या सुट्टीच्या दिवशी सुरु राहतील. उपलब्ध सुविधेचा लाभ घेऊन वीज ग्राहकांनी आपल्या चालू वीजबिलासह थकबाकीचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
वीजबिल थकबाकी कमी करण्यासाठी थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम कल्याण व भांडुप परिमंडलात सुरू आहे. सुट्टीच्या दिवशीही ही मोहीम सुरू राहणार असून संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी थकबाकीचा त्वरित भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. अधिकृत वीजबिल भरणा केंद्रासह महावितरणचे मोबाईल ॲप, www.mahadiscom.in हे संकेतस्थळ तसेच विविध पेमेंट वॉलेटचा उपयोग करून घरबसल्या वीजबिलाचा ऑनलाईन भरणा करण्याची सुविधाही ग्राहकांना उपलब्ध आहे. ग्राहकांनी अखंडित वीज सेवेसाठी उपलब्ध सुविधांचा उपयोग करून चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करावा.
सोबतच कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांना केवळ मूळ थकबाकीच्या रकमेचा एकरकमी किंवा सहा हप्त्यांत भरणा करून थकबाकीमुक्ती व पुनर्जोडणीची संधी देणाऱ्या अभय योजनेची मुदत ३१ मार्चला संपत आहे. मुदत संपण्यापूर्वी संबंधित ग्राहकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…