सई ताम्हणकर पहिल्यांदाच थिरकणार लावणीवर

मुंबई: ‘देवमाणूस’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून तो २०२५ च्या बहुचर्चित मराठी चित्रपटांपैकी एक ठरला आहे. तेजस देऊस्कर दिग्दर्शित आणि लव रंजन व अंकुर गर्ग यांच्या ‘लव फिल्म्स’ निर्मित, या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणूका शहाणे आणि सुबोध भावे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

नुकतीच या चित्रपटातील महत्वपूर्ण गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण करणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर ‘देवमाणूस’मध्ये पहिल्यांदाच लावणी सादर करणार आहे.

हे गाणे एप्रिलमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, सई ताम्हणकरच्या चाहत्यांसाठी तसेच मराठी प्रेक्षकांसाठी ही एक विशेष भेट असणार आहे. पहिल्यांदाच सई मोठ्या पडद्यावर लोककला सादर करताना दिसणार आहे.

याबद्दल सई सांगते, “लव फिल्म्ससोबत काम करण्याची आणि ‘देवमाणूस’ परिवाराचा भाग होण्याची संधी मिळाल्याने मी प्रचंड आनंदी आहे. अशा प्रतिभावान टीमसोबत काम करणे एक अविस्मरणीय अनुभव आहे. पहिल्यांदाच मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन लावणी सादर करत आहे आणि माझ्या चाहत्यांनी व प्रेक्षकांनी ती पाहावी, यासाठी मी खूप उत्सुक आहे. आत्ताच फार काही सांगू शकत नाही, मात्र मी जे काही सादर करणार आहे, ते प्रेक्षकांसाठी एक नवीन आणि वेगळा अनुभव ठरेल, याची मला खात्री आहे!”

‘लव फिल्म्स’ प्रस्तुत ‘देवमाणूस’, तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित आणि लव रंजन व अंकुर गर्ग निर्मित, हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Comments
Add Comment

सतीश शहांच्या निधनानंतर अभिनेता सुमित राघवनला अश्रू अनावर

मुंबई : चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे लोकप्रिय ज्येष्ठ विनोदी अभिनेते सतीश शहा

साठाव्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी किंग खानची खास 'भेट'; गाजलेले चित्रपट पुन्हा होणार प्रदर्शित

मुंबई: बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुख खान १९९१ मध्ये दिल्लीहून मुंबईत आला आणि त्यानंतर तो थेट करोडो प्रेक्षकांच्या

सुप्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक सतीश शाह यांचे निधन

किडनीच्या आजाराने मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास मुंबई: बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध

'क्योंकि सास भी कभी बहू थी' २ मध्ये झळकणार बिल गेट्स

मुंबई : २००० ते २००८ च्या कालावधीत घराघरात पोहोचलेली हिंदी मालिका म्हणजेच 'क्योंकि सास भी कभी बहू थी' ही मालिका आता

सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची फाईल पुन्हा उघडणार?

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्युप्रकरणाला आता तब्बल चार वर्षांहून अधिक काळ उलटला असला तरी या

रितेश देशमुखने शब्द पाळला; पाठपुरावा करुन मृत ज्युनियर आर्टिस्टच्या कुटुंबाला केली लाखमोलाची मदत!

मुंबई : 'राजा शिवाजी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान साताऱ्याजवळ कृष्णा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या सौरभ