Gaurav Ahuja Pune : पुण्यात अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजाची सुटका !

  103

पुणे : पुण्यात रस्त्याच्या बाजूला उभा राहून अश्लील वर्तन करणाऱ्या गौरव आहुजा बद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. दि ८ मार्च रोजी पुण्याच्या शास्त्रीनगर जंक्शनवर बीएमडब्ल्यू कारमधून उतरुन सार्वजनिक ठिकाणी लघवी आणि अश्लिल वर्तन केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या गौरव अहुजाची अखेर जामीनावर सुटका होणार असल्याची बातमी समोर आली आहे.



८ मार्च रोजी पुण्याच्या शास्त्रीनगर जंक्शनवर गौरव अहुजाने लघवी केली. तसेच अश्लिल वर्तन करुन दाखवले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. त्या व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर तो फरार होता. परंतु काही तासांतच गौरव आहुजाने एक व्हिडिओ प्रसारित करत घडल्या प्रकारावर माफी मागत, "मी आठ तासात पोलिसांसमोर हजर होईन" असं म्हटलं होतं. याप्रकरणी गौरव आहुजाच्या मित्राला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मात्र आता तब्बल १७ दिवसांनी आरोपी गौरव अहुजाची जामिनावर सुटका होणार आहे. जामीन आदेशात असे म्हटले आहे की, आहुजाने सरकारी वकिलांच्या साक्षीदारांवर प्रभाव टाकू नये असा इशारा देण्यात आला आहे. सोबतच, न्यायालयाची परवानगी घेतल्याशिवाय त्याने भारत सोडू नये असे निर्देश देण्यात आले आहेत. न्यायालयाने गौरव आहुजाला दर सोमवारी सकाळी ११ ते दुपारी २ च्या दरम्यान येरवडा पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याचे निर्देश दिले आहेत.

Comments
Add Comment

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ

चिपळूण पिंपळी येथे कोसळलेल्या पुलाची मंत्री उदय सामंत करणार पाहणी

शनिवारी रात्री चिपळूण तालुक्यात पूल दुर्घटना घडली. चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसीकडे जाणारा महत्वाचा पूल