नंबरप्लेट बदलण्याच्या प्रक्रियेला पुणेकरांचा थंड प्रतिसाद

पुणे : पुणे शहरात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याच्या प्रक्रियेला नागरिकांकडून फारसा उत्साह दिसत नाही. वाहनांची चोरी व बनावट नंबर प्लेट सुरू करण्यासाठी ही प्रणाली केंद्र सरकारने लागू केली असली तरी पुण्यात अजूनही वाहनचालक याकडे दुर्लक्ष करत आहेत.

पुण्यात एचएसआरपी नंबर प्लेटसाठी नागरिकांचा कमी प्रतिसाद असून अद्याप अडीच लाख वाहनधारक या नंबर प्लेटच्या प्रतीक्षेतच असल्याचे समोर आले आहे. दरम्यान ही नंबर प्लेट बसविण्यासाठीची मुदत ३० जुनपर्यंत वाढविण्यात आली आहे. राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार पुणे शहरात या नंबर प्लेट बसवण्यासाठी नागरिकांच्या केंद्रावर रांगा लागल्या असताना पुणेकरांचा या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटला कमी प्रतिसाद असल्याची माहिती समोर आली आहे. परिवहन विभागाने प्रत्येक वाहनाला ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट’ (एचएसआरपी) अनिवार्य केली आहे. परंतु परराज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात या नंबरप्लेटचे शुल्क सर्वाधिक असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. अनेक वाहन चालकांनी या नंबरप्लेटकडे पाठ फिरवली आहे.
Comments
Add Comment

वारकरी संप्रदायाचा सर्वोच्च बहुमान; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'संत एकनाथ महाराज वारकरी सेवा गौरव पुरस्कार' जाहीर

पैठण : वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा आणि पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज संस्थानकडून

लोणार सरोवराबाबत चिंतेची बाब; सरोवरात वाढतेय पाण्याची पातळी

बुलढाणा: पर्यटक आणि शास्त्रज्ञांचे आकर्षण केंद्र असलेल्या महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील

नागपूर महापालिका निवडणूक: १५१ जागांसाठी प्रशासन सज्ज, दुबार मतदारांवर विशेष नजर

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. मनपा आयुक्त अभिजित चौधरी

विद्यार्थ्यांचा अनादर केल्यास शिक्षकांवर होणार कठोर कारवाई

शिक्षण विभागाकडून कठोर नियमावली; सुरक्षेत कसूर झाल्यास शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक जबाबदार मुंबई :

धक्कादायक! कर्ज फिटवण्यासाठी केला मृत्यूचा बनाव; एक मेसेज आणि सत्याचा उलगडा

लातूर: फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या गणेश चव्हाण नावाच्या तरुणाने आपल्याच मृत्यूचा बनाव केल्याची धक्कादायक

अंबेजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात! तिघांचा जागीच मृत्यू

बीड: अंबेजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावर स्कॉर्पिओ आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ३ जणांचा जागीच