मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (Maharashtra State Road Transport Corporation or MSRTC) अर्थात एसटी महामंडळात अनेक वर्षे एकाच ठिकाणी अधिकारी असल्यामुळे कारभारात अपेक्षित गतिमानता येत नाही, अशी ओरड होऊ लागली आहे. याची गंभीर दखल घेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळात सुपरफास्ट बदल्या करण्याचे नियोजन केले आहे. एसटी महामंडळात एकाच मुख्यालयात तीन वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या करण्याचे आदेश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाला सोमवारी दिले. यामुळे राज्यातील सुमारे एक हजार अधिकाऱ्यांची बदली होणार आहे. या बदल्यांचे आदेश लवकरच जारी होणार असल्याचे वृत्त आहे.
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात कामगार संघटनांनी सरनाईक यांची भेट घेतली. यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार उपस्थित होते. याप्रसंगी झालेल्या चर्चेत अधिकाऱ्यांचा मुद्दा आला. अधिकारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी असल्यामुळे निवडक कर्मचाऱ्यांशी हितसंबंध निर्माण होणे, तून आर्थिक गैरव्यवहारांची शक्यता वाढणे, महामंडळाच्या कामांव्यतिरिक्त अन्य कामांसाठी हितसंबंधांचा गैरवापर करणे असे प्रकार सुरू होतात. यामुळे सामान्य कर्मचाऱ्यांवर अन्याय होतो. एसटी महामंडळाच्या सेववर प्रतिकूल परिणाम होतो. यामुळे एकाच मुख्यालयात तीन वर्षांपेक्षा जास्त वेळ कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने बदली करावी, असे निवेदन आमदार पडळकर यांनी दिले. अधिवेशन संपल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून बदल्यांबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन सरनाईक यांनी दिले. यानंतर बदल्यांचे नियोजन सुरू झाले आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटी महामंडळाच्या १३१० बस खरेदी करण्याच्या निविदेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर सुपरफास्ट बदल्यांचे नियोजन झाले.
जम्मू-काश्मीरसह उत्तर भारत हादरले काबूल : अफगाणिस्तान-ताजीकिस्तान सीमावर्ती भागात शनिवारी (दि. १९) भूकंपाचे तीव्र धक्के…
कोलकाता : वक्फ दुरुस्ती विधेयकावरून पश्चिम बंगालमध्ये उसळलेल्या हिंसाचारावर भाजप नेते आणि सुप्रसिद्धी अभिनेता मिथुन…
नाशकात दुपारी १ ते ४ दरम्यान ट्रॅफिक सिग्नल राहणार बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय! नाशिक :…
नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा पाऊस मुंबई: सध्या मराठी कलाविश्वात सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ या लावणीची जोरदार…
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देण्याचे तसेच गहिनीनाथ गडाला…
निरोगी त्वचा असणे ही सर्वांचीच इच्छा असते. मात्र, निरोगी आणि सुंदर दिसणाऱ्या त्वचेची योग्य काळजी…