Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरला ३ दिवसांची पोलीस कोठडी

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत (Chhatrapati Shivaji Maharaj) आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी प्रशांत कोरटकरला (Prashant Koratkar) काल (२४ मार्च) तेलंगणातून अटक केली. आज (२५ मार्च) त्याला कोल्हापूरच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.


यावेळी प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचे दाखले देत अटकेवर आक्षेप घेतला. पोलिसांनी चौकशीसाठी सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती, मात्र न्यायालयाने ती नाकारत तीन दिवसांचीच कोठडी मंजूर केली.



प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी युक्तिवाद करताना, "तो तपासात सहकार्य करत असल्याचे आधीच सांगितले असताना अटक करण्याची गरज नव्हती," असा मुद्दा मांडला. तसेच, त्याच्यावर लावण्यात आलेल्या कलमांनुसार सात वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते, मग अटकेची गरज काय?" असा सवाल उपस्थित केला. यावर सरकारी वकिलांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊनच अटकेची कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट केले.


सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले की, प्रशांत कोरटकरच्या विधानांमुळे मोठे तणाव निर्माण झाले आहेत आणि त्याचे व्हॉइस सॅम्पल घेण्याची गरज आहे. तसेच, त्याने स्वतःहून मोबाईल जमा न करता त्यातील डेटा डिलीट केल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. तो महिनाभर फरार होता, त्यामुळे अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.


वकील असिम सरोदे यांनी नमूद केले की, आवाजाचे नमुने वैज्ञानिक पद्धतीने घेतले जातात आणि त्यामध्ये स्वर व व्यंजन महत्त्वाचे असतात. आरोपीचा आवाज बदलला जाण्याची शक्यता असल्यामुळे वेगवेगळ्या वेळी त्याची जबानी घेणे गरजेचे आहे.


या प्रकरणी कोल्हापूर न्यायालयात सुनावणी सुरू असताना शिवप्रेमी आक्रमक झाल्याचे चित्र दिसून आले. सुनावणीनंतर प्रशांत कोरटकरला कोर्टाबाहेर आणले असता एका शिवप्रेमीने त्याला चप्पल दाखवण्याचा प्रयत्न केला. तसेच, न्यायालयात हजर करण्यापूर्वीही परिसरात मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी उपस्थित होते. एका व्यक्तीने हातात कोल्हापूरी चप्पल घेत "हे ९ नंबरचे पायताण बरोबर प्रशांत कोरटकरच्या गालावर उठवायचे आहे," अशी संतप्त प्रतिक्रिया दिली.

Comments
Add Comment

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग