Nashik Kumbh Mela : कुंभमेळा प्राधिकरण कायदा लवकरच

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाशिकमध्ये घोषणा


नाशिक : कुंभमेळ्याची कामे त्वरित सुरू करण्यासाठी प्राधिकरण कायदा करण्यात येणार असून या प्राधिकरणात फक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांनाच स्थान देण्यात येणार आहे. साधू-महंतांचा त्यात समावेश नसेल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नाशिक येथील विविध कार्यक्रमांसाठी रविवारी नाशिक येथे आले असता शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधला.



प्रारंभी कांद्याचे निर्यातमूल्य कमी करून केंद्राने राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतल्याबद्दल फडणवीस यांनी केंद्र शासनाचे आभार मानले. आमचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. गोदावरीतील पाण्याच्या दर्जाबाबत विचारले असता पाण्याचा दर्जा सुधारण्यासाठी पुढच्या महिन्यापासूनच मलनिस्सारण केंद्राचे काम सुरू करण्यात येणार आहे. गोदावरीतील २४ नाल्यांचे पाणी शुद्धीकरणासाठी लवकरच कृती कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. त्र्यंबकच्या विकासासाठी ११०० कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. सिंहस्थाच्या कामांना गती देण्याची गरज असल्याने लवकरच प्राधिकरण कायदा तयार करण्याची घोषणा त्यांनी केली. मात्र या प्राधिकरणात केवळ प्रशासकीय व्यक्ती असतील. धार्मिक व्यक्तींचा त्यात समावेश नसेल असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रयागप्रमाणेच सिंहस्थाची जबाबदारी घेणार का असे विचारले असता राज्यातील प्रत्येक कामाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर असतेच त्यामुळे त्यासाठी वेगळी व्यवस्था गरजेची नसल्याचे ते म्हणाले. पालकमंत्र्यांची नियुक्ती अंतिम टप्यात असून, लवकरच घोषणा होईल, असेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

उत्पन्ना एकादशीचे महत्त्व आणि पाळा हे नियम! जाणून घ्या सविस्तर...

दर महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशीला उपवास आणि व्रत केले जाते. प्रत्येक एकादशीला विशिष्ट असे

Honda India Power Products Q2 Results: होंडा इंडिया पॉवरचा तिमाही निकाल जाहीर निव्वळ नफ्यात थेट ३०.८०% वाढ

मोहित सोमण: होंडा इंडिया पॉवर प्रॉपर्टी लिमिटेडने आपला आर्थिक तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीला इयर ऑन इयर

बांगलादेशी, रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई कडक करा: मंगलप्रभात लोढा यांची मागणी

मुंबई : एकीकडे मालाड आणि मालवणी परिसरात बांग्लादेशी आणि रोहिंगे घुसखोर राहत असल्याचे निदर्शनाला येत असतानाच

महाराष्ट्र शासनाचे रत्ने व आभूषणे धोरण जाहीर

मुंबई : राज्य सरकारनं रत्ने आणि आभूषण उद्योगाला जागतिक स्पर्धेत आघाडीवर नेण्यासाठी राज्य शासनाने ‘रत्ने व

पर्यावरणवादी पद्मश्री सालूमरदा थिमक्का यांचे निधन

वयाच्या ११४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास नवी दिल्ली : प्रसिद्ध पर्यावरणवादी, पद्मश्री पुरस्कार विजेत्या

सात महिन्यांत ‘फुकट्यां’कडून मध्य रेल्वेची १४१ कोटींची दंड वसुली

मुंबई  : मध्य रेल्वेने २०२५-२६ मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या २३.७६ लाख प्रवाशांकडून १४१ कोटी रुपये दंड वसूल