विशाखापट्ट्णम: आयपीएल २०२५मध्ये लखनऊ सुपरडजायंट्स आणि दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यातील सामना जबरदस्त रंगला. या सामन्यात शेवटपर्यंत कोण जिंकेल हे सांगता येत नव्हते. अखेरीस दिल्लीच्या आशुतोष शर्माने जिंकण्यासाठीचा षटकार खेचला आणि दिल्लीला विजय मिळवून दिला.
आशुतोष शर्माने अखेरपर्यंत नाबाद राहत दिल्लीच्या विजयात मोठी भूमिका निभावली. त्याने नाबाद ६६ धावा केल्या. हा खरंच आश्चर्यजनक सामना होता. ७ धावांत ३ विकेट गमावल्यानंतर चौथ्या स्थानावरील कर्णधार अक्षऱ पटेलने २२ धावा केल्या. खरंतर दिल्लीच्या फलंदाजांना धावांचा पाठलाग करणे तितके सोपे नव्हते. कारण ठराविक अंतराने विकेट पडत होते. मात्र आशुतोष शर्मा शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिला आणि त्याने दिल्लीचा विजय सुकर केला. दिल्लीने लखनऊविरुद्धचा सामना १ विकेट आणि ३ बॉल राखत जिंकला.
तत्पूर्वी, पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या लखनऊ सुपरजायंट्सने २०९ धावा करत दिल्लीसमोर मोठे आव्हान ठेवले होते.लखनऊकडून निकोल पूरन आणि मिचेल मार्श यांनी तडाखेबंद खेळी केली. दुसऱ्या स्थानावर खेळण्यासाठी आलेल्या मिचेल मार्शने ३६ बॉलमध्ये ७२ धावा केल्या. यात त्याने ६ चौकार आणि ६ षटकार ठोकले. निकोलस पूरनने ३० बॉलमध्ये ७५ धावा तडकावल्या. यात त्याने ६ चौकार आणि ७ षटकार ठोकले.
या दोघांच्या खेळीच्या जोरावर लखनऊ सुपरजायंट्सला २०० धावांचा टप्पा पार करता आला. दिल्ली कॅपिटल्सकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक ३ विकेट मिळवल्या. तर कुलदीप यादवने २ विकेट घेतल्या.