पुणे : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांचा विश्वासू वाल्मिक कराड तसेच त्याचे सहकारी तुरुंगात आहेत. या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. संतोष देशमुख यांची ज्या क्रूरपणे हत्या करण्यात आली ते पाहून अनेकांना धक्का बसला आहे. न्यायालयात खटला सुरू आहे. संतोष देशमुख यांचे लहान भाऊ धनंजय देशमुख आणि मस्साजोगचे ग्रामस्थ न्यायासाठी पाठपुरावा करत आहेत. या पार्श्वभूमीवर बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याने देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी आमिरने देशमुख कुटुंबीयांचे सांत्वन केले. आमिर खान संतोष देशमुख यांच्या मुलांना भेटला.
पुण्यातील बालेवाडी स्टेडियम येथे रविवार २३ मार्च रोजी पाणी फाऊंडेशनचा कार्यक्रम झाला. पाणी फाऊंडेशनचा फार्मर कप पुरस्कार वितरण सोहळ्याचा हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि संतोष देशमुख यांचा लहान मुलगा विराजही उपस्थित होते. यावेळी अमिर खान आणि किरण राव यांनी संतोष देशमुख यांचा मुलगा विराज देशमुख आणि धनंजय देशमुख यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
आमिर खानने धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा केली. देशमुख कुटुंबाची विचारपूस केली. आमिर खानशी बोलत असताना धनंजय देशमुखांचे डोळे पाणावले होते. आमिर खान यांनी खांद्यावर हात ठेवत त्यांना धीर दिला. तसेच, विराज देशमुखला जवळ घेत कडकडून मिठी मारली. यावेळी आमिर खानच्या डोळ्यातही पाणी होते.
उच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती मुंबई : विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग…
स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर डायरेक्टोरेट ऑफ इर्फोसमेन्ट (ईडी)ने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सोनिया गांधी व…
मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी…
दक्षिण भारतीय साईभक्तांकडून सर्वाधिक मुकुट शिर्डी : ज्यांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीने नतमस्तक झाल्यावर माणसाचं…
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…