Sushant Singh : सुशांत सिंहची आत्महत्याच; सीबीआयचा खुलासा!

  48

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याचा २०२० साली निधन झाले होते. सुशांत सिंहने गळफास घेतला असून याप्रकरणाखाली रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आणि तिच्या कुटुंबाला आरोपी ठरवले जात होते. दरम्यान, आता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात कोणालाही दोषी ठरवले नसून सीबीआयने (CBI) रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाला क्लीन चिट दिली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर (Sushant Singh Rajput Case) सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर केलेले आरोप आणि रियाने सुशांतच्या कुटुंबावर केलेले आरोप या दोन्ही प्रकरणांमध्ये क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे. ऑगस्ट २०२० मध्ये सीबीआयने सुशांत प्रकरण ताब्यात घेतले आणि तपास सुरू केला. ४ वर्षांच्या तपासानंतर, सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. त्यानुसार रिया आणि तिच्या कुटुंबाला क्लीन चिट देण्यात आली आहे. सुशांतला कोणीतरी आत्महत्या करण्यास भाग पाडले होते हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा सीबीआयला सापडला नाही.


'हा राखून होता, हे सिद्ध करण्याइतपत कोणताही तोंडी किंवा भौतिक पुरावा आम्हाला सापडलेला नाही. सुशांतच्या बहिणीने त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यामुळे तिची चौकशी करण्यासाठी सीबीआयने इतके दिवस वाट पाहिली. पण ती सीबीआयसमोर हजर राहिली नाही. सुशांतच्या मृत्यू प्रकरणात वैज्ञानिक पुराव्यांमधूनही कोणताही गैरप्रकार दिसून आला नाही. त्यामुळेच अखेर पाच वर्षांनी क्लोजर रिपोर्ट दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला," असे सीबीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले.



पुराव्यात कसलीही छेडछाड नाही


सीबीआयने सुशांतच्या आत्महत्येचा तपास एम्सच्या तज्ज्ञांकडून करून घेतला होता. या प्रकरणात, एम्सच्या फॉरेन्सिक टीमने कोणताही गैरप्रकार केला नसून सोशल मीडिया चॅट्स एमएलएटी द्वारे चौकशीसाठी अमेरिकेला पाठवण्यात आल्या. त्या तपासात चॅट्समध्ये कसलीही छेडछाड न झाल्याचे समोर आले आहे.



सीबीआयच्या अहवालात काय म्हटलं आहे?



  • सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली होती, त्याला आत्महत्येसाठी कोणीही जबरदस्ती केली नाही.

  • रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाला क्लीन चिट मिळाली.

  • या प्रकरणी कोणताही गुन्हेगारी अँगल किंवा 'फाऊल प्ले' आढळला नाही.

  • AIIMS फॉरेन्सिक टीमनेही हत्येची शक्यता नाकारली.

  • सोशल मीडिया चॅट्स अमेरिकेत पाठवून तपास केला. त्यामध्ये छेडछाड केल्याचा कोणताही पुरावा सापडला नाही.

Comments
Add Comment

Sambhajinagar Illegal Construction: छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध बांधकामावर हातोडा; विरोध करणाऱ्यावर होणार कायदेशीर कारवाई

विरोध करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश  संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने दोन दिवसांच्या

OBC reservation : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार!

२७ टक्के ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका फेटाळली नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात गेल्या अनेक

शिक्षकाने लॉजमध्ये जाऊन का केली आत्महत्या?

नांदेड : नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कंधार तालुक्यातील एका खासगी शिक्षण संस्थेत कार्यरत

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता