नाशिक : महाराष्ट्रात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर २०२७ मध्ये कुंभमेळा होणार आहे. या कुंभमेळ्यासाठी सरकारी पातळीवर तयारी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री दादा भुसे यांनी नाशिक जिल्ह्याचा दौरा केला. सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्यासाठी मेळा प्राधिकरणाची स्थापना करणार असल्याचे जाहीर केले. विकासकामांसाठी पुरेसा निधी दिला जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
उत्तरप्रदेशच्या धर्तीवर महाकुंभसाठी कायदा केला जाईल. गोदावरी प्रदुषणमुक्तीसाठी पुढील महिन्यांपासून काम सुरू होईल. नाशिकप्रमाणे त्र्यंबकेश्वरचाही विकास केला जाईल. उत्तर प्रदेश येथे महाकुंभसाठी कायदा तयार करण्यात आला, आपणही तसाच कायदा करणार आहोत; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Malvani Bhasha Bhavan : कोकणात लवकरच ‘मालवणी भाषा भवन’ उभारणार
कुंभमेळ्यासाठी नाशिक जिल्ह्यात ११ पूल तयार करण्याचा निर्णय झाला आहे. नवीन घाट बनवण्यात येतील. एसटीपीचे जाळे तयार करून पाणी शुद्धीकरणाचे काम केले जाईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. कोणत्याही प्राधिकरणात साधू महंत नाहीत. प्रशासकीय कामांमध्ये सरकारी अधिकारी त्यांची जबाबदारी पार पाडतील. तर कुंभमेळ्याची अध्यात्मिक बाजू ही साधूमहंत हाताळतील; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. कुंभमेळ्यासाठी मेळा प्राधिकरण हे प्रशासकीय प्राधिकरण म्हणून काम करेल; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.