
स्वारगेट प्रकरणातील अत्याचाराच्या प्रकरणातील सत्य आले समोर
पुणे : स्वारगेट शिवशाही बलात्कार प्रकरणातील शिवशाही बसची शास्त्रोक्त पडताळणी करण्यात आली आहे. अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. या पडताळणीतून त्या तरुणीचा आवाज ऐकू का आला नाही या प्रश्नाचे उत्तर आता समोर आले आहे.

नवी दिल्ली : भारताने कोळसा उत्पादनात दमदार कामगिरी करत, ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. भारताने कोळसा उत्पादनात १०० कोटी टनांचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. ...
स्वारगेट बस स्थानकावर बसमध्ये मुलीवर बलात्कार केल्यानंतर तो त्याच्या गावात शांतपणे लपून बसला होता. ७० तासांच्या प्रयत्नानंतर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले होते. त्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दत्तात्रेय गाडेवर बसमध्ये तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आता शिवशाही बसची शास्त्रोक्त पडताळणी केली आहे. स्वारगेट एसटी बसस्थानकात घडलेल्या अत्याचार प्रकरणात बसमधून आवाज बाहेर येतो की नाही याची पोलिसांनी शास्त्रोक्त पडताळणी केली आहे.