Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्यास ३० जूनपर्यंत मुदतवाढ

वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्यास ३० जूनपर्यंत मुदतवाढ

मुंबई: राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) पाटी बसविण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्यासाठी ३१ मार्च २०२५ पर्यंत वाहन मालकांना मुदत देण्यात आली होती.


आजपर्यंत जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्याचे काम कमी झाले असल्याने उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्यासाठी ३० जून २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.


१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या जुन्या वाहनांना ही पाटी बसविण्याकरिता ३ संस्थाची /उत्पादकांची परिवहन विभागामार्फत निवड केली आहे. तरी संबंधित वाहन मालकांनी याची नोंद घेऊन ०१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी असलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्यात यावी, असे आवाहन परिवहन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Comments
Add Comment