मुंबई : गेल्या काही दिवसांपासून Realme च्या आगामी स्मार्टफोनची चर्चा सुरु होती. फेब्रुवारीमध्ये Realme P3x आणि P3 Pro लाँच केल्यानंतर अखेर आज Realmeने आणखी दोन जबरदस्त स्मार्टफोन लाँच केले आहेत. Realme P3 Ultra 5G आणि Realme P3 5G अशी या दोन्ही फोनची नावे असून या स्मार्टफोन्समध्ये 50MP चा मुख्य रिअर कॅमेरा आहे. हे फोन अनेक स्टोरेज आणि रॅम व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आले (Realme P3 Ultra) आहेत. जाणून घ्या याबाबतची इतर वैशिष्ट्ये.
Realme P3 Ultra 5G मध्ये १२० Hz रिफ्रेश रेट आणि १,५०० nits पीक ब्राइटनेससह ६.८३-इंचाचा १.५K क्वाड-कर्व्हड AMOLED डिस्प्ले आहे. Realme P3 Ultra 5G मध्ये ग्लो-इन-द-डार्क लूनर डिझाइन आहे. हे डिव्हाइस MediaTek Dimensity ८३५० Ultra प्रोसेसरद्वारे समर्थित आहे, ज्यामध्ये १२ GB पर्यंत LPDDR5x RAM आणि २५६ GB UFS ३.१ स्टोरेजसह जोडलेले आहे. फ्रेम रेट बॅलेंस करण्यासाठी यात GT बूस्ट टेक्नोलॉजी आहे. डिव्हाइसमध्ये ८०W चार्जरसह ६,००० mAh बॅटरी देण्यात आली आहे.
त्याचबरोबर Realme P3 Ultra 5G मध्ये ५० MP Sony IMX896 कॅमेरा आणि ८ MP अल्ट्रावाइड लेन्स आहे. यात १६ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. हे भारतातील खास नेपच्यून ब्लू, लेदर फिनिशसह ओरियन रेड तसेच ग्लोइंग लूनर व्हाइट रंगात विकले जाईल. या फोनला IP६६, IP६८ आणि IP६९ रेटिंग मिळेल.
Realme P3 Ultra फोनच्या ८GB रॅम आणि १२८GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २६ हजार ९९९ रुपये इतकी आहे. ८GB रॅम आणि २५६GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत २७ हजार ९९९ रुपये आहे. त्याबरोबरच, फोनच्या टॉप व्हेरिएंट १२GB+ २५६GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २९ हजार ९९९ रुपये आहे. फोनवर ४ हजार रुपयांची सूट मर्यादित काळासाठी आहे. फोनची विक्री २५ मार्च २०२५ रोजी दुपारी १२ वाजता Flipkart वर सुरू होईल.
Realme P3 5G मध्ये ६.६७-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट १२० Hz आहे आणि त्याची कमाल ब्राइटनेस २,००० nits आहे. हे डिव्हाइस स्नॅपड्रॅगन ६th Gen ४ चिपसेटद्वारे समर्थित आहे जे ८GB पर्यंत रॅम आणि २५६GB स्टोरेजसह जोडलेले आहे. एवढेच नाही तर दोन्ही फोनमध्ये AI अल्ट्रा टच कंट्रोल आणि AI मोशन कंट्रोल सारखे जीटी बूस्ट फीचर्स देखील उपलब्ध आहेत. यात ४५W चार्जरसह ६,००० mAh बॅटरी आहे. फोनमध्ये ५० MP मुख्य कॅमेरा आणि २ MP डेप्थ सेन्सर वापरण्यात आला आहे. यात १६ MP सेल्फी कॅमेरा आहे. Realme P3 5G नेबुला पिंक, स्पेस सिल्व्हर आणि कॉमेट ग्रे रंगांमध्ये उपलब्ध आहे.
Realme P3 5G फोनची किंमत १६ हजार ९९९ रुपयांपासून सुरू होते. ही या फोनच्या ६GB रॅम आणि १२८GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत आहे. ८GB रॅम आणि १२८GB स्टोरेज असलेल्या फोनचा व्हेरिएंट १७ हजार ९९९ रुपयांना लाँच करण्यात आला आहे. फोनचा टॉप व्हेरिएंट ८GB रॅम आणि २५६ GB स्टोरेजसह येतो, त्याची किंमत १९ हजार ९९९ रुपये आहे. या फोनची अर्ली बर्ड सेल आज संध्याकाळी ६ वाजल्यापासून सुरू होईल. तिन्ही प्रकारांवर २ हजार रुपयांची सूट असेल. या फोनची सेल २६ मार्च रोजी दुपारी १२ वाजता सुरू होईल.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…