
एफआयआरनुसार फईम शमीम खान प्रमुख आरोपी
नागपूर : औरंगजेबच्या कबरीवरून नागपुरात झालेली दंगल पूर्वनियोजित होती. तसेच मायनॉरिटी डेमॉक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष फईम शमीम खान या दंगलीचा मास्टर माईंड असल्याची माहिती पोलिसांच्या एफआयआरमधून पुढे आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी फईम याला अटक केली आहे.
नागपुरातील दंगल पूर्वनियोजित असल्याच्या विधानाला पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी देखील दुजोरा दिला आहे.आरोपी फईम शमीम खान हा या हिंसाचाराचा प्रमुख आरोपी आहे. फईम व्यतिरीक्त पोलिसांनी ५१ लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. प्रमुख आरोपी फईम यानेच १७ मार्च रोजी घटनेच्या दिवशी सकाळी ११ वाजता ३० ते ४० जणांचा जमा केले आणि पोलिसांना निवेदन देण्यास गेला. यावेळी विहिंप आणि बजरंग दल कार्यकर्त्यांविरोधात आरोप फहीम खानने पोलिसांकडे केला. यानूसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र त्यानंतरदेखील फहीम खानने पुन्हा जमाव एकत्र केला आणि शिवाजी चौकात येऊन तणाव निर्माण करण्यास सुरुवात केली.

पुणे : पुण्यातील हिंजवडी परिसरामध्ये बसला आग लागल्याने चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सहा जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार ...
पोलीस हिंदु समाजाचे आहेत, आपली मदत ते करत नाही, असं सांगत फहीम खान आंदोलनकर्त्यांना भडकवत होता, अशी माहिती समोर आली आहे. गेल्या विधानसभा निवडणूक फहीम खानने निवडणूक देखील लढवली होती. मात्र त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता.
यासोबतच नागपूरच्या चिटणीस पार्क ते सीए रोड कडे जाणाऱ्या रस्त्यावर सोमवारी १७ तारखेला हिंसा सुरू असताना घडलेली एक लाजीरवाणी घटना देखील उजेडात आली आहे. याठिकाणी महिला पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत असताना अंधाराचा फायदा घेत विशिष्ट जमावाने त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही दंगलखोरांनी पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्याची वर्दी खेचण्याचे प्रयत्न केला. हे लाजिरवाणी कृत्य करणाऱ्या जमावाविरोधात नागपूरच्या गणेश पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच ठिकाणी असलेल्या इतर महिला पोलिसांनाही जमावातून शिवीगाळ आणि अश्लील शेरेबाजीही करण्यात आल्याचा एफआयआरमध्ये उल्लेख आहे.