समाजमाध्यमांच्या वाढत्या वापराबाबत महाराष्ट्र नागरी सेवा नियमात बदल

Share

मुंबई : महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ चे नियम तयार करताना तेव्हा सोशल मीडिया अस्तित्वात नसल्याने त्यात समाज माध्यमे वापरासंदर्भात कोणताही उल्लेख नव्हता.बदलत्या काळानुसार आणि सोशल मीडियाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, पुढील तीन महिन्यात या नियमांमध्ये बदल करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. शासकीय कर्मचाऱ्यांकडून समाजमाध्यमांच्या वाढत्या वापरावर बंधने नसल्याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य डॉ.परिणय फुके, प्रवीण दरेकर आणि विक्रम काळे यांनी मांडली, त्यास मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शासकीय कर्मचाऱ्यांनी समाजमाध्यमांचा उपयोग जनतेशी संवाद साधण्यासाठी आणि सार्वजनिक हितासाठी करावा. या संदर्भात कठोर नियम तयार करण्याची गरज असून जम्मू-कश्मीर,गुजरात, अन्य राज्ये तसेच लाल बहादुर शास्त्री अकादमी यांनी यासंदर्भात तयार केलेल्या नियमांनुसार महाराष्ट्र देखील आपल्या सेवाशर्तींमध्ये सुधारणा करून समाजमाध्यमासंदर्भातील स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे तयार करणार आहे. या नियमांसंदर्भात पुढील तीन महिन्यात एक शासन निर्णय जारी करण्यात येईल. यासंदर्भात काही सूचना असल्यास संबंधितांनी त्या पुढील एक महिन्यात सामान्य प्रशासन विभागाकडे (सेवा) द्याव्या, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Recent Posts

Vasai Crime : अपघात नव्हे घातपात! किरकोळ वादाच्या रागात भावानेच केला बहिणीचा खून

मुंबई : दोन दिवसांपूर्वी वसईतील (Vasai Crime) एका सात वर्षीय चिमुकल्या मुलीच्या मृत्यूची घटना घडली…

11 minutes ago

KDMC : कल्याणमध्ये सौरऊर्जेवर चालणारा पोर्टेबल ट्राफिक सिग्नल

कल्याण : वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने (KDMC) कल्याणमधील सहजानंद चौकात सौरऊर्जेवर चालणारा…

25 minutes ago

Sunscreen Lotion : सनस्क्रीन लोशन लावायचंय.. पण ते निवडायचं कसं?

मुंबई : सध्या बाहेर कुठेही बाहेर पडायचं झालं तरी चेहरा, अंग झाकेल असे कपडे घालूनच…

34 minutes ago

Afganisthan Earthquake : अफगाणिस्तानमध्ये ५.९ तीव्रतेचा भूकंप!

जम्मू-काश्मीरसह उत्तर भारत हादरले काबूल : अफगाणिस्तान-ताजीकिस्तान सीमावर्ती भागात शनिवारी (दि. १९) भूकंपाचे तीव्र धक्के…

1 hour ago

Mithun Chakraborty : “पश्चिम बंगाल हातून निसटतोय”- मिथुन चक्रवर्ती

कोलकाता : वक्फ दुरुस्ती विधेयकावरून पश्चिम बंगालमध्ये उसळलेल्या हिंसाचारावर भाजप नेते आणि सुप्रसिद्धी अभिनेता मिथुन…

2 hours ago