Tuesday, April 29, 2025
Homeताज्या घडामोडीराज्यातील ६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील ६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारकडून पुन्हा एकदा आयएएस ६ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात केल्या आहेत. त्यामध्ये, नागपूरच्या अतिरिक्त आयुक्तांना मुंबईत बढती देण्यात आली असून आंचल गोयल यांना मुंबईच्या जिल्हाधिकारीपदी संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, कालच नागपूरमध्ये २ गटांत तणाव निर्माण झाल्यामुळे नागपूर शहर राज्यात चर्चेत होते. दरम्यान, सध्या नागपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यातच, आता नागपूरच्या अतिरिक्त महापालिका आयुक्तांची बदली करण्यात आली आहे.

नागपूरसह जळगाव, नांदेड, पालघर आणि गडचिरोलीतील अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. त्यामध्ये, नागपूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांची मुंबईच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नांदेड जिल्हा परिषदेच्या मीनल करनवाल यांना जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे किनवट येथील आयटीडीपी प्रकल्प संचालक कवली मेघना यांची नांदे जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

जव्हार येथील आयटीडीपी प्रकल्प संचालक करिश्मा नायर यांना नाशिक महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तीपदी नियुक्ती देण्यात आलीय. गडचिरोलीच्या कुरखेडा उपविभागातील सहायक जिल्हाधिकारी रणजित मोहन यादव यांना गडचिरोलीतील आयटीडीपी प्रकल्प अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -