Sunday, April 20, 2025
Homeब्रेकिंग न्यूजSamay Raina : समय रैनाच्या अडचणीत भर, सायबर सेलने बजावला नवा समन्स

Samay Raina : समय रैनाच्या अडचणीत भर, सायबर सेलने बजावला नवा समन्स

मुंबई : ‘इंडियाज गॉट लेटेंट’मध्ये (India’s Got Latent) युट्युबर रणवीर अलाहबादियाने केलेल्या वादग्रस्त विधानानंतर महाराष्ट्र सायबर विभागाने गुन्हा दाखल प्रकरणी युट्यूबर समय रैनाला पुन्हा समन्स बजावले आहे. समय रैनाला १९ मार्चला चौकशीला उपस्थित राहण्यासाठी सांगितले आहे. युट्युबर समय रैना परदेशात असल्यामुळे आपली चौकशी व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे घ्यावी, अशी मागणी केली होती. पण ती मागणी महाराष्ट्र सायबर विभागाने फेटाळून लावली आहे. त्याला पुन्हा समन्स पाठवून चौकशीला उपस्थित राहण्यास सांगण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. यामुळे समय रैनाच्या अडचणीत मोठी भर पडली आहे.

महाराष्ट्र सायबर विभागाने यूट्यूबर समय रैनाला समन्स बजावले होते. त्यानुसार त्याला १७ मार्चला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होत. पण तो अनुपस्थित राहिला. रैना परदेशात असल्यामुळे त्याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांचा जबाब नोंदवण्याची विनंती केली. सध्या रैना हा देशाबाहेर असल्यामुळे त्याने ही विनंती केली. मात्र, महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांना मागणी फेटाळली आणि त्याला वैयक्तिकरित्या उपस्थित राहून जबाब नोंदवावा लागेल, असे सांगितले. त्यांच्या जबाबासाठी त्याला १९ मार्चला कफ परेड येथील महाराष्ट्र सायबर विभागाच्या कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. तो सध्या अमेरिकेमध्ये असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

औरंगजेबाचे गोडवे गाणारे देशद्रोहीच; एकनाथ शिंदेंचा घणाघात

३०, ४० जणांविरोधात गुन्हा दाखल

‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोच्या नुकत्याच झालेल्या एका भागात अलाहबादियाने वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यात तो परीक्षक म्हणून उपस्थित होता. त्याच्यासोबत इतर लोकप्रिय कंटेंट क्रिएटर्स अशिष चंचलानी, जसप्रीत सिंग आणि अपूर्वा मुखीजाही होते. एका स्पर्धकाशी संभाषण करताना अलाहबादियाने वादग्रस्त विधान केले. या वक्तव्यामुळे त्याच्यावर समाज माध्यमांवर टीका झाली आणि मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर महाराष्ट्र सायबर विभागाने याप्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागासह गुवाहाटी पोलिसांनीही गुन्हा दाखल केला आहे. यामुळे समय रैनाच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याला आता चौकशीसाठी हजर राहावेच लागणार आहे, नाहीतर पुन्हा एकदा त्याच्या अडचणी वाढू शकतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -