Indian Education System : देशातील सर्व शिक्षण मंडळे आता समान पातळीवर

पुणे : केंद्र सरकारकडून देशभरातील सर्व शिक्षण मंडळे समान पातळीवर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अानुषंगाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (राज्य मंडळ) आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) यांच्यातर्फे १७ ते २१ मार्च या कालावधीत नववी ते बारावीच्या शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून, त्यात समग्र प्रगतीपत्रक माध्यमिक स्तर व प्रश्नपत्रिकांचे प्रमाणीकरण याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २०२३, राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२४ मधील बदलांना अनुसरून शिक्षकांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने पुण्यातील यशदा येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण विभागाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाचे अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले.



राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, एनसीईआरटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि परखच्या विभागप्रमुख डॉ. इंद्राणी भादुरी, राज्य मंडळ अध्यक्ष, माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी, योजना संचालक डॉ. महेश पालकर, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील उपस्थित राहणार आहेत. इयत्ता नववी ते बारावी या वर्गांतील विद्यार्थ्यांचा समग्र विकास आणि प्रगतीशी संबंधित मूल्यांकन प्रक्रियेसाठी परख या राष्ट्रीय मूल्यांकन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.


परख अंतर्गत समग्र प्रगतीपत्रक ही संकल्पना मांडण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वंकष प्रगतीचे मूल्यांकन करण्याचा उद्देश त्यामागे आहे. त्यामुळे समग्र प्रगतीपत्रक, प्रश्नपत्रिका निर्मिती, पृथक्करण व प्रमाणीकरण करण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षित केले जाणार आहे. विविध राज्यांच्या प्रश्नपत्रिकांच्या तुलनात्मक अभ्यासावरही या कार्यशाळेत प्रकाश टाकला जाणार आहे. राज्य मंडळाकडून निर्मित केल्या जाणाऱ्या प्रश्नपत्रिका अधिकाधिक अचूक आणि उच्चतम दर्जाच्या निर्माण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.

Comments
Add Comment

पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी

मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भाविकांच्या श्रद्धेचा महासागर उसळणार असून, त्या महासागराला सुरक्षित,

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या गड किल्ल्यांवर जाण्यास बंदी; वन विभागाचा आदेश जारी

पुणे : अनेकजण नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री गडकिल्ल्यावर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर

मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून सरकारचे खास पाऊल

मुंबई: आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास