Weight Loss: वजन कमी करायचे आहे...या गोष्टींसोबत खा चिया सीड्स

मुंबई: चिया सीड्सला एक सुपरफूड म्हटले जाते. वजन कमी करण्यासाठी हे अतिशय फायदेशीर आहे. चिया सीड्स खूप लहान काळे दाणे असतात जे पाण्यात टाकल्यावर काही वेळाने फुगतात. चिया सीड्समध्ये फायबर, प्रोटीन आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिड असतात जे वजन कमी करण्यात फायदेशीर ठरतात.


आज आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहोत जे तुम्ही चिया सीड्ससोबत खाल्ले पाहिजे. चिया सीड्ससोबत खाल्ल्याने पोषकतत्वे बॅलन्स होतात.


चिया सीड्स आणि दही - दही प्रोबायोटिक्स, कॅल्शियम आणि प्रोटीनचा चांगला सोर्स मानला जातो. चिया सीड्ससोब दह्याचे सेवन परफेक्ट मानले जाते. दह्यामध्ये चिया सीड्स मिसळून खाल्ल्याने तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.



चिया सीड्स आणि ओट्स - ओट्समध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. सोबतच यात कार्बोहायड्रेट्स असते यामुळे वारंवार लागणाऱ्या भुकेपासून वाचता येते.


चिया सीड्स आणि नारळपाणी- नारळपाणी एक नॅचरल इलेक्ट्रोलाईट असते जे तुम्हाला हायड्रेट ठेवायला तसेच पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. नारळपाण्यामध्या चिया सीड्स मिसळून खाल्ल्याने रिफ्रेशिंग वाटते.


चिया सीड्स आणि फ्रुट्स- फ्रेश फ्रुट्समध्ये फायबर, व्हिटामिन आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. फ्रुट्समध्ये चिया सीड्स मिसळून खाल्ल्याने पौष्टिक स्नॅक्स तयार होते. यामुळे खाण्याचे क्रेव्हिंग्सही कमी होतात.

Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे