मुंबई : विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी भाजपा शिवसेने पाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या उमेदवाराचेही नाव जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत विजय मिळाल्यामुळे ५ आमदारांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे या जागा रिक्त झालेल्या आहेत. या पाच जागंसाठी २७ मार्चला पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी राष्ट्रवादीच्या वाट्याला एक जागा आली आहे.
Shivsena : विधान परिषदेसाठी शिवसेनेचा उमेदवार ठरला! ‘या’ नेत्याला मिळणार संधी
मिळालेल्या माहितीनुसार, विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने संजय खोडकेंना उमेदवारी जाहीर केली आहे. संजय खोडके हे अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेत तसेच ते आमदार सुलभा खोडके यांचे पती आहेत. ते आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. कारण आज दुपारी तीन वाजता उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपणार आहे. याच्या काही आधी अजित पवारांनी खोडके यांच्या नावाची घोषणा केली आहे.