Devendra Fadnavis : …म्हणून औरंगजेबाच्या कबरीला दिलं जातंय संरक्षण

Share

मुंबई : औरंगजेबाच्या कबरीला पुरातत्व विभागाने संरक्षण दिले आहे. यामुळे महाराष्ट्र शासनाला तिथे संरक्षणाची व्यवस्था करणे बंधनकारक आहे. पण कबरीला संरक्षण दिले तरी महाराष्ट्र शासन औरंगजेबाचे आणि त्याच्या कबरीचे कौतुक करत नाही, करणार नाही. औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण होणार नाही; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली.

आज आपण आपल्या मंदिरात जाऊन ईष्ट देवतेची साधना करू शकतो. याचे एकमेव कारण छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांनी देश, देव, धर्माची लढाई जिंकली, म्हणून तुम्ही-आम्ही हिंदू आहोत. आपल्या देवतेचे दर्शन घेऊ शकतो; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराजांचे सुंदर मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिराला सुंदर तटबंदी बांधण्यात आली आहे. अतिशय चांगला बुरुज आहे. दर्शनी प्रवेशाचा मार्ग आहे. बगिच्याची जागा आहे. शिवरायांच्या जीवनातील सगळे प्रसंग त्या ठिकाणी पहायला मिळतात; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

‘ज्या काळात या देशातील राजे, रजवाडे मुगलांची, परकीय आक्रमकांची मनसबदारी मिळवून त्यांच्या अधिपत्याखाली काम करत होते. ज्यावेळेला लढण्याची शक्ती क्षीण झाली होती, कोणाचे तरी सरदार म्हणून मिरवण्याची प्रथा निर्माण झाली होती, त्यावेळी आई जिजाऊंचे संस्कार घेऊन यातून मुक्तता मिळवण्यासाठी, या परकियांना धडा शिकवला पाहिजे, यासाठी शिवाजी महाराज लढले. आई जिजाऊंनी शिवरायांना घडवले;’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आपण प्रभू श्रीरामांना युगपुरुष म्हणतो. प्रभू श्रीराम हे युगपुरुष का आहेत?. प्रभू श्रीराम ईश्वर होते, मग रावणाशी लढण्यासाठी त्यांना सैन्याची आवश्यकता का होती ? त्यांनी चमत्काराने रावणाला हरवायला पाहिजे होतं. पण ते युगपुरुष होते. त्यांना असुरी शक्ती विरोधात लढू शकतो हा आत्मविश्वास समाजात निर्माण करायचा होता. समाज घडवायचा होता. यासाठीच त्यांनी समाजातील छोट्यात-छोट्या व्यक्तींना एकत्र केलं. त्यांच्यात विश्वास निर्माण केला. त्याच बळावर जगातील मोठ्या अधर्मी शक्तीचा नि:पात केला. रावणाची शक्ती कितीही मोठी असली, तरी ती अर्धमाची शक्ती आहे. अर्धमाच्या शक्तीला हरवण्याची ताकद माझ्यात आहे, असा विश्वास समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत निर्माण केला. म्हणून एका नव्या युगाची निर्मिती करणारे प्रभू श्रीराम युगपुरुष आहेत; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

छत्रपती शिवरायांनी अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र केलं. शेतकरी, अलुतेदार – बलुतेदार यांना एकत्र केलं. त्यांच्यात पौरुषत्व निर्माण केलं. देव, देश, धर्मकारिता लढण्यासाठी विचारांचं बीजारोपण केलं. आपल्याला राजा, सिंहासनाकरता लढायचं नाहीय तर देव, देश धर्माकरता लढायचं आहे हा विचार रुजवला. यातून शिवरायांनी असे मावळे घडवले ज्यांनी खानाच्या फौजांशी लढाई केली. खानाच्या लाखांच्या फौजा यायच्या, पाच हजार मावळे त्या लाखांच्या फौजांना पराभूत करायचे, पळवून लावायचे. हे महान कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या प्रेरणेतून घडले. पुढे मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले. याच कारणासाठी कौतुक करायचे तर छत्रपती शिवाजी महाराजांचे करायचे; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Recent Posts

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

17 minutes ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

41 minutes ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

1 hour ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

2 hours ago

KKR vs GT, IPL 2025: गिल-बटलरची तुफानी खेळी, गुजरातने केकेआरसमोर ठेवले १९८ धावांचे आव्हान

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…

2 hours ago